पोेलीस अधीक्षक सचिन पाटील यांची बदली; शहाजी उमाप नवे अधीक्षक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:21 AM2021-09-10T04:21:23+5:302021-09-10T04:21:23+5:30
नाशिक ग्रामीण पोलीस दलाचे अधीक्षक सचिन पाटील यांनी वर्षभरापूर्वीच तत्कालीन अधीक्षक डॉ. आरती सिंग यांच्याकडून पदभार स्वीकारला होता. तीन ...
नाशिक ग्रामीण पोलीस दलाचे अधीक्षक सचिन पाटील यांनी वर्षभरापूर्वीच तत्कालीन अधीक्षक डॉ. आरती सिंग यांच्याकडून पदभार स्वीकारला होता. तीन वर्षांचा कालावधी पूर्ण होण्याअगोदरच पाटील यांची बदली करण्यात आल्याने यामागील नेमके कारण काय? याविषयी पोलीस दलात चर्चा सुरू झाली आहे. मुंबई पोलीस दलात व्हीआयपी सुरक्षा विभागात उपायुक्त असलेले शहाजी उमाप यांच्याकडे जिल्ह्याच्या ग्रामीण पोलीस दलाची सूत्रे सोपविण्यात आली आहेत.
आगामी निवडणुका व त्याची आचारसंहिता व न्यायालयीन आदेश त्यास अनुसरून महाराष्ट्र पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. नागपूर येथील राज्य गुप्तवार्ता विभागातील अनिता पाटील, जळगाव पोलिस दलात अपर अधीक्षक म्हणून असलेले सचिन गोरे, अहमदनगरच्या अपर अधीक्षक दीपाली काळे यांचीही महाराष्ट्र पोलीस अकादमीत पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गोरे यांनी सिंहस्थ कुंभमेळ्यादरम्यान नाशिक शहर पोलीस दलात सहायक आयुक्त म्हणून काम बघितले आहे.
--इन्फो--
मालेगावचे शिंदे यांचीही बदली
नागरी हक्क संरक्षण विभागातील माधुरी केदार यांची ग्रामीण अपर अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
मुंबई गुन्हे शाखेतील उपायुक्त अकबर इलाही पठाण यांची नाशिक नागरी हक्क संरक्षण विभागाच्या अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. दरम्यान, नाशिकच्या राज्य गुप्त वार्ता विभागाचे पोलीस उपायुक्त रमेश चौधरी यांची जळगाव पोलीस दलात अपर अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मालेगाव उपविभागीय अधिकारी शशिकांत शिंदे यांची कोल्हापूरला बदली करण्यात आली आहे.
090921\09nsk_53_09092021_13.jpg~090921\09nsk_54_09092021_13.jpg
शहाजी उमाप नवे अधीक्षक~शहाजी उमाप नवे अधीक्षक