‘त्या’ लाभार्थ्यांना घरकुल योजनेत स्थलांतरीत करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2018 11:51 PM2018-11-03T23:51:22+5:302018-11-03T23:52:29+5:30
मालेगाव : गेल्या महिन्यात नागछाप झोपडपट्टीला अचानक आग लागून सुमारे १७८ झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. महापालिकेच्या मालकीच्या मोकळ्या भुखंडांवरील, नागछाप झोपडपट्टीला जोडणाऱ्या रस्त्यांवरील अतिक्रमण धारकांना व आगित दुर्घटनाग्रस्त झोपडपट्टीधारकांकडून कायदेशीररित्या कागदपत्रांची पूर्तता करुन त्यांचे म्हाळदे घरकुल योजनेत स्थलांतरीत करावे तसेच नागछाप झोपडपट्टीत लागलेल्या आगीत नुकसान झालेल्या झोपडपट्टीधारकांची एक वर्षाची पाणीपट्टी व घरपट्टी माफ करावी, महापालिकेकडून आपदग्रस्तांना आर्थिक मदत करता येईल का? याबाबत शासनाकडून अभिप्राय व मत मागविण्याच्या सूचना महापौर रशीद शेख यांनी महासभेत प्रशासनाला केल्या आहेत.

नागछाप झोपडपट्टीला लागलेल्या आगीनंतर आपदग्रस्तांच्या मदतीबाबत विचार विनिमय करण्यासाठी शनिवारी महापौर रशीद शेख यांच्या अध्यक्षतेखाली व उपायुक्त नितीन कापडणीस, नगरसचिव राजेश धसे यांच्या उपस्थितीत विशेष महासभा बोलविण्यात आली होती. या महासभेत नागछाप झोपडपट्टी भागातील झोपडपट्टीधारकांना स्थलांतरीत करण्याविषयावर चर्चा करण्यात आली. खाजगी जागेवरील अतिक्रमणधारक वगळून महापालिकेच्या मालकीच्या मोकळ्या भूखंडांवर, रस्त्यांवर अतिक्रमीत असलेल्या व म्हाळदे घरकुल योजनेत पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांची तातडीने स्थलांतरीत करण्याच्या सूचना महापौरांनी केल्या. तसेच आगबाधित १७८ झोपडपट्टीधारकांना एक वर्षाची पाणीपट्टी व घरपट्टी माफ करण्याच्या सूचना महापौरांनी केली. प्रशासनाला याबाबत अडचण असेल तर महापौरांनी स्वत: पाणीपट्टी व घरपट्टी पोटीचे पैसे भरण्याची घोषणा सभागृहात केली. आपदग्रस्तांना महापालिकेकडून आर्थिक मदत देता येईल का याबाबत शासनाकडून अभिप्राय व मत मागविण्याच्या सूचना नगरसेवकांनी केल्या. झोपडपट्टी भागात रूग्णवाहिका व अग्निशमन दलाची कशी जाईल अशी व्यवस्था करण्याची गरज असल्याचे सांगत महापौरांनी स्थलांतराच्या विषयावर कुठल्याही राजकीय पक्षाने राजकारण करू नये. नागरिक पैसे भरुन घरकुल योजनेत स्थलांतर करण्यास तयार आहेत. सर्व सोयीसुविधा युक्त इमारत आहे. झोपडपट्टीधारक स्थलांतरीत झाले तर जुन्या शहराच्या सौंदर्यात भर पडेल, असे महापौरांनी सांगितले. दरम्यान, महागठबंधन आघाडीच्या नगरसेवकांनी मानधन व सदस्यांनी वैयक्तीक ८० हजार रूपयांची आर्थिक मदत नागछाप झोपडपट्टीतील आग बाधित रहिवाशांना देण्याचे आश्वासन सभागृहात दिले आहे.
उपायुक्तांची असंवेदनशिलता सभागृहात उघडमनपाच्या विशेष महासभेस नागछाप झोपडपट्टीतील आग बाधितांना मदतीच्या गंभीर विषयावर सभागृहात चर्चा सुरू असताना उपायुक्त नितीन कापडणीस भ्रमणध्वनी चाळण्यात व्यस्त होते. त्यांना विषयाचे गांभीर्य नसल्याची बाब एमआयएमचे गटनेते डॉ. खालीद परवेझ यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी कापडणीस यांना चांगलेच धारेवर धरीत खडसावले. त्यानंतर त्यांनी भ्रमणध्वनीला हात लावला नसल्याचे सभागृहात दिसून आले.अग्निशमन अधिकारी, जवानांचा सत्कार
नागछाप झोपडपट्टीला लागलेल्या आगीनंतर अग्निशमन दलाच्या अधिकारी व जवानांनी जीवाची परवा न करता आग विझविल्याने मोठा अनर्थ टळला. महापौर रशीद शेख यांनी अग्निशमन दलातील अधिकारी व कर्मचाºयांचे कौतुक केले. तसेच अग्निशमन दलाचे अधीक्षक संजय पवार व जवानांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.