शिक्षकांकडून बदलीसाठी हृदय शस्त्रक्रियेची खोटी माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 01:18 AM2018-07-22T01:18:18+5:302018-07-22T01:18:34+5:30
आॅनलाइन बदलीसाठी शिक्षकांनी कुटुंबातील व्यक्तींच्या आजारपणाची व स्वत:च्या आजारपणाची कारणे दिली असून, यातील बहुतांश माहिती खोटी असल्याचा संशय जिल्हा परिषद प्रशासनाला आहे. काही शिक्षकांनी हृदय शस्त्रक्रीय झालेली नसतानाही प्रमाणपत्र दाखल केल्याचे निर्देशनास आले.
नाशिक : आॅनलाइन बदलीसाठी शिक्षकांनी कुटुंबातील व्यक्तींच्या आजारपणाची व स्वत:च्या आजारपणाची कारणे दिली असून, यातील बहुतांश माहिती खोटी असल्याचा संशय जिल्हा परिषद प्रशासनाला आहे. काही शिक्षकांनी हृदय शस्त्रक्रीय झालेली नसतानाही प्रमाणपत्र दाखल केल्याचे निर्देशनास आले. शिक्षकांनी दिलेले प्रमाणपत्र आणि आजाराबाबत सांगितलेल्या माहितीत शिक्षकांचा गोंधळ उडाला. त्यामुळे अशा गैरप्रकारांच्या तपासणीसाठी आजारपणाशी संबंधित कागदपत्रांची जिल्हा शल्यचिकित्सकां कडून पडताळणी करून घेण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिली. आॅनलाइन बदलीप्रक्रियेत खोट्या माहितीच्या आधारे सोयीची बदली पदरात पाडून घेणाऱ्या १६६ शिक्षकांची सुनावणी प्रक्रिया सलग दुसºया दिवशीही पूर्ण होऊ शकली नाही. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांच्यासमोर आपली बाजू मांडण्यासाठी एका मागून एक येणाºया शिक्षकांची कै फियत ऐकून घेण्यात आणि शिक्षकांनी आॅनलाइन माहिती भरण्यात केलेल्या चुका निदर्शनास आणून देण्यात अधिक वेळ गेल्याने शनिवारी सुनावणी प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. बागलाण, कळवण, चांदवड, नांदगाव, देवळा, मालेगाव आणि इगतपुरी तालुक्यातील शिक्षकांची मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी शिक्षणाधिकारी वैशाली झनकर तसेच गटशिक्षणाधिकारी, बांधकाम विभागाचे अभियंता यांच्या सहाय्याने तांत्रिक यंत्रणेच्या माध्यमातून सत्यतेची पडताळणी केली जात आहे. यात शिक्षकांशी प्रत्यक्ष बोलून त्यांच्या कागदपत्रांच्या सत्यतेविषयी, तसेच बदली अंतरातील तांत्रिक बाबी पडताळून पाहिल्या जात असून, याप्रक्रियेत अधिक वेळ जात असल्याने सुनावणीच्या पहिल्या दिवशी शुक्रवारी प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे उर्वरित शिक्षकांची शनिवारी (दि. २१) सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत सुनावणी घेण्यात आली. यात प्रामुख्याने पाच तालुक्यांमधील शिक्षकांच्या सुनावण्या झाल्या. परंतु शनिवारीही सुनावणीची प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे उर्वरित शिक्षकांना रविवारी सकाळी १० वाजता बोलाविण्यात आले आहे. दरम्यान, बदलीसाठी दिलेले अंतर शिक्षकांनी चुकीचे दिल्याचे यावेळी दिसून आले, तर काही शिक्षकांनी खोटी माहिती दिल्याची कबुलीही दिल्याची माहिती गिते यांनी दिली आहे.
शिक्षकांचे पितळ सुनावणी प्रक्रियेतून उघडे
बदलीतून सूट मिळविण्यासाठी आणि सोयीच्या बदलीसाठी अपंग प्रमाण पत्राप्रमाणेच आजारपणाची प्रमाणपत्रे आणि संलग्न कागदपत्रांची तपासणीही यावेळी करण्यात आली. त्यामुळे आॅनलाइन बदलीप्रक्रियेत अनेक शिक्षकांनी चुकीची माहिती भरून सोयीच्या बदल्या मिळविल्याचे पडताळणीत समोर आले असून, चुकीची माहिती देणाºया शिक्षकांचे पितळ सुनावणी प्रक्रियेतून उघडे पडल्याने बोगस माहिती देणाºया शिक्षकांवर कारवाई होणे निश्चित झाले आहे.