राज्यातील २५ वित्त अधिकाऱ्यांच्या बदल्या
By admin | Published: June 18, 2014 11:50 PM2014-06-18T23:50:55+5:302014-06-19T00:59:15+5:30
नाशिक : राज्यातील वर्ग एक श्रेणीतील २५ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश निर्गमित झाले असून, नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी नरेंद्र महाजन यांच्या बदलीचा समावेश आहे.
नाशिक : वित्त विभागांतर्गत येणाऱ्या राज्यातील वर्ग एक श्रेणीतील २५ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश निर्गमित झाले असून, त्यात नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी नरेंद्र महाजन यांच्या बदलीचा समावेश आहे. विशेष म्हणजे महाजन यांना साडेतीन वर्षे नाशिकला झालेली असताना त्यांना आणखी वर्षभर मुदतवाढ देण्याचा प्रस्तावही तयार करण्यात आला होता, मात्र मुख्यमंत्र्यांनी तो नाकारल्याचे कळते.
राज्यातील लेखा विभागातील अन्य काही अधिकाऱ्यांच्या मुदतवाढीचे प्रस्तावही नाकारण्यात आल्याची चर्चा आहे. नरेंद्र महाजन यांची नाशिकहून मुंबईला संचालक (लेखा) धर्मादाय आयुक्त, वरळी येथे बदली झाली आहे. त्यांच्या जागी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे अर्थ सल्लागार व मुख्य लेखा अधिकारी रा. सो. महाले यांची जिल्हा परिषदेच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारीपदी बदली झाली आहे. अन्य बदली झालेल्या अधिकाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे कंसात बदलीचे ठिकाण- उपसंचालक सई दळवी (उपसंचालक, वित्त व लेखा), पोलीस महासंचालक मुंबई, रश्मी नांदिवडेकर (वित्तीय सल्लागार, राजीव गांधी जीवनदायी योजना), ठाणे मुख्य लेखा व वित्त अधिकारी संजय पतंगे (मुख्य लेखा परीक्षक, परभणी महापालिका), कल्याण-डोंबिवली महापालिका मुख्य लेखा व वित्त अधिकारी अनुदीप दिघे (मुख्य लेखा परीक्षक, लातूर महापालिका), पुणे मुख्य लेखा व वित्त परिषद (मुख्य लेखा व वित्त अधिकारी, सातारा), पुणे-चिंचवड महापालिका मुख्य लेखा परीक्षक भगवान घाडगे (मुख्य लेखा व वित्त अधिकारी, कल्याण-डोंबिवली महापालिका), सातारा मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्रीमती भारती देशमुख (मुख्य लेखा व वित्त अधिकारी, पुणे), कोल्हापूर मुख्य लेखा व वित्त अधिकारी गणेश पाटील (मुख्य लेखा परीक्षक, कोल्हापूर महापालिका), उस्मानाबाद मुख्य लेखा व वित्त अधिकारी अंकुश नवले (वित्तीय नियंत्रक, नगर परिषद संचालनालय, मुंबई), वर्धा मुख्य लेखा व वित्त अधिकारी विजय कोल्हे (मुख्य लेखा परीक्षक, धुळे महापालिका), औरंगाबाद निबंधक वर्ग-१ दीपाराणी देवतराज (मुख्य लेखा परीक्षक, सोलापूर महापालिका), नागपूर महापालिका उपसंचालक (लेखा परीक्षण) सुवर्णा पांडे (मुख्य लेखा व वित्त अधिकारी, नागपूर), औरंगाबाद कोषागार अधिकारी श्रीमती रे. अ. ब. काझी (स्थानिक निधी लेखा, उपसंचालक, औरंगाबाद) यांचा समावेश आहे. तसेच लेखा व उपसंचालक पदावरील ११ अधिकाऱ्यांच्याही बदल्या झाल्या आहेत.(प्रतिनिधी)