महापालिकेत तीन वर्षे कार्यकाल पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2019 01:54 AM2019-01-05T01:54:57+5:302019-01-05T01:55:16+5:30
महापालिकेत आयुक्त बदलताच प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाºयांच्या मागण्या होऊ लागल्या आहेत. परंतु आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी ज्या कर्मचाºयाने तीन वर्षे संबंधित पदावर पूर्ण केले असतील त्यांचीच बदली करण्यात येणार असल्याचे निकष जाहीर केले असल्याने अनेकांची कोंडी झाली आहे. यासंदर्भात जानेवारी महिन्याच्या अखेरीस अहवाल सादर करण्याचे आदेशदेखील त्यांनी खातेप्रमुखांना दिले आहेत.
नाशिक : महापालिकेत आयुक्त बदलताच प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाºयांच्या मागण्या होऊ लागल्या आहेत. परंतु आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी ज्या कर्मचाºयाने तीन वर्षे संबंधित पदावर पूर्ण केले असतील त्यांचीच बदली करण्यात येणार असल्याचे निकष जाहीर केले असल्याने अनेकांची कोंडी झाली आहे. यासंदर्भात जानेवारी महिन्याच्या अखेरीस अहवाल सादर करण्याचे आदेशदेखील त्यांनी खातेप्रमुखांना दिले आहेत.
महापालिकेच्या आस्थापनांवरील विविध अधिकारी आणि कर्मचाºयांच्या गेल्यावर्षी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कारकिर्दीत बदल्या झाल्या होत्या. अनेकांना या बदल्या सोयीपेक्षा गैरसोयीच्या अधिक वाटत असल्याने अशा अधिकारी आणि कर्मचाºयांनी आता बदलीसाठी प्रयत्न सुरू केले आहे. मुंढे यांच्या अगोदरही बदल्या झाल्यानंतर सोयीच्या ठिकाणी बदली झालेली नाही त्यांनीदेखील बदलीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत यासंदर्भात राजकीय नेते आणि नगरसेवकदेखील प्रशासनाकडे प्रयत्न करीत आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार बदल्यांमध्ये राजकीय हस्तक्षेपांना मनाई असली तरी दबावतंत्र मात्र सर्रास सुरू आहे.
निकषांवर आधारित होणार बदल्या
आयुक्त गमे यांनी आता बदलीसाठी नियमानुसार धोरण ठरवले असून, ज्या कर्मचाºयांना एकाच ठिकाणी तीन वर्षे पूर्ण झाली आहेत तेथून त्यांची बदली करण्यात येणार आहे. त्यामुळे एकाच ठिकाणी ठाण मांडून बसणाºयांची उचलबांगडी अटळ दिसत आहे, दुसरीकडे बदली करताना संबंधित अधिकारी किंवा कर्मचाºयाने त्या विभागात यापूर्वी काम केले नसेल अशाच ठिकाणी बदली करण्यात येणार आहे. या निकषावर आधारित बदल्यांचे प्रस्ताव जानेवारी अखेरपर्यंत आयुक्तांनी सादर करण्यास सांगितले आहेत.
विठ्ठल मंचतर्फे संगीत भजन रजनी
नाशिक : सायखेडा येथील श्री विठ्ठल संगीत मंच यांच्या वतीने संगीत भजन रजनी या सांगितिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पंडित रमाकांत गायकवाड व त्यांचे पिताश्री भजनसम्राट सूर्यकांत गायकवाड या पितापुत्रांनी सांप्रदायिक नियमाप्रमाणे जय जय रामकृष्णहरी ते जय जय विठ्ठल रखुमाई भजन (पंचपती) सादर करून सर्व रसिकश्रोत्यांना भक्तिरसाने मंत्रमुग्ध केले. विविध संतांच्या रचना वेगवेगळ्या रागांमधून सादर केल्या.