धामडकी शाळेचा कायालपालट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2019 02:20 PM2019-01-09T14:20:10+5:302019-01-09T14:20:18+5:30
इगतपुरी : देणाऱ्याने देत जावे, घेणाºयाने घेत जावे. घेता घेता देणाºयाचे हात घ्यावेत. सामाजिक बांधिलकी जोपासत गावाचा, शाळेचा कायापालट होऊ शकतो हे दाखवून दिले ते अॅडव्हेंचर टूर अँड डेव्हलपमेंट यांच्या आणि सिंगापूर इंटरनॅशनल स्कूलने.
इगतपुरी : देणाऱ्याने देत जावे, घेणा-याने घेत जावे. घेता घेता देणाºयाचे हात घ्यावेत. सामाजिक बांधिलकी जोपासत गावाचा, शाळेचा कायापालट होऊ शकतो हे दाखवून दिले ते अॅडव्हेंचर टूर अँड डेव्हलपमेंट यांच्या आणि सिंगापूर इंटरनॅशनल स्कूलने. या स्कूलने इगतपुरी तालुक्यातील अतिदुर्गम जिल्हा परिषदेच्या धामडकी प्राथमिक शाळेत चार दिवसाचे शिबिर घेत विविध कार्यक्रम घेत शाळेचा चेहरामोहराच बदलून टाकला. शाळेतील शिक्षक बाळू कुलाल यांना श्रद्धांजली वाहण्यात येवून शिबिराची सुरु वात करण्यात आली.त्यानंतर सिंगापूर इंटरनॅशनल स्कूल दहिसरच्या विद्यार्थ्यांनी शालेय सफाई आणि गावाचे सर्वेक्षण केले. चार दिवसांच्या कॅम्पमध्ये शाळेसाठी अनेक वर्षांपासून नादुरु स्त असलेले मुलांचे स्वच्छतागृह, दरवाजा, कमोड फ्लॅश टँक इ. सर्व सुविधांनी सुसज्ज असे दुरु स्त करून दिले. विद्यार्थ्यांना बसण्यासाठी मैदानावर कडप्पा बेंच तयार करण्यात आले.शालेय इमारत, स्वच्छतागृह रंगकाम करण्यात आले.पाण्याची टाकी, नळ कनेक्शन, हँडवॉश बेसीन शालेय इमारतीचे तीन पडक्या खिडक्या बदलून नवीन खिडक्या बसवण्यात आल्या. शाळेच्या आवारात सोलर स्ट्रीट लावण्यात आले. एवढेच नाही तर वाडीत दोन सोलर स्ट्रीट बसवून वाडीचा अंधार दूर केला.शालेय दरवाजे, खिडक्या यांना आॅईल पेंट रंग देऊन शालेय इमारत सजवण्यात आली.शाळेतील सर्व मुलांना पादत्राणे भेट दिले. रविवार सुट्टी असूनही शाळेत मुलांची १०० टक्के हजेरी होती. चार दिवस वाडीत जत्रेचे स्वरूप होते. या चार दिवसात वाडीतील सर्व ग्रामस्थ सिंगापूर इंटरनॅशनल स्कूल दहिसरच्या सर्व विद्यार्थ्यांची काळजी घेत होते.