मनसापुरी महाराज मंदिर परिसराचा कायापालट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:17 AM2021-08-29T04:17:39+5:302021-08-29T04:17:39+5:30
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील ऋषीमुनी मनसापुरी महाराज देवस्थान मंदिर परिसराचा ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून कायापालट करण्यात आला आहे. यामुळे ...
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील ऋषीमुनी मनसापुरी महाराज देवस्थान मंदिर परिसराचा ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून कायापालट करण्यात आला आहे. यामुळे मंदिर परिसर शोभनीय झाला असून, भाविकांचा या मंदिराकडे ओढा वाढला आहे. मठात मनसापुरी महाराज यांचे समाधीस्थान असून, तीन वर्षांपूर्वी येथे श्री. अंबिका माता, मनसापुरी महाराज व गुरुदेव दत्तात्रय महाराज मंदिराचा जीर्णोद्धार झाला होता. त्यानंतर मंदिर परिसरातील अनेक कामे अपूर्ण अवस्थेत होती. गावातील ज्येष्ठ भाविकांनी एकत्र येवून मंदिर परिसराचा कायापालट करण्याचा निर्णय घेतला. गावातील दानशूर व्यक्ती व लोकवर्गणीच्या माध्यमातून गेल्या दोन महिन्यांपासून सुशोभिकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मंदिरावरील तीनही कलशाचे आधुनिक पद्धतीने रंगकाम करण्यात आले आहे. तसेच अंबिका माता मंदिरासमोर आकर्षक अशी दीपमाळ उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून, मंदिराच्या आवारात पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम सुरू आहे, तसेच मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचे मजबुतीकरण करण्यात आले आहे. गावातील ग्रामस्थांनी मंदिराचा कायापालट होण्यासाठी सढळ हाताने मदत केली आहे. मंदिर परिसराच्या चोहोबाजूंनी वृक्षारोपण करण्यात येणार आहे. त्यामुळे मंदिर परिसर उजाळून निघाला आहे.
------------------
नांदूरशिंगोटे येथील मनसापुरी महाराज देवस्थान मठाचा लोकवर्गणीतून कायापालट व सुशोभिकरणाचे काम सुरू आहे. (२८ मंदिर)
280821\28nsk_8_28082021_13.jpg
२८ मंदीर