देवळाली कॅम्प परिसरातील गावात परिवर्तन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:18 AM2021-01-19T04:18:14+5:302021-01-19T04:18:14+5:30
देवळाली कॅम्प : परिसरातील बहुतांश ग्रामपंचायत निवडणुकीत प्रस्थापितांना धक्का देत नवोदितांनी सरशी केली आहे. गावागावात नेतृत्वात बदल झाले. ...
देवळाली कॅम्प : परिसरातील बहुतांश ग्रामपंचायत निवडणुकीत प्रस्थापितांना धक्का देत नवोदितांनी सरशी केली आहे. गावागावात नेतृत्वात बदल झाले. मतदानाच्या वाढत्या टक्केवारीचा अनेकांना फटका बसला. लहवित ग्रामपंचायतीमध्ये विद्यमान उपसरपंच प्रा. ज्ञानेश्वर गायकवाड, शंकर मुठाळ यांच्या नेतृत्वाखाली ग्रामविकास पॅनलने १५ पैकी ८ जागा जिंकून सत्ता राखली आहे. तर पी.एल. गायकवाड, निवृत्ती मुठाळ, खंडू गायकवाड, भारत आहेर, संदीप गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनलने सहा जागा तर एका जागेवर अपक्षाने बाजी मारली आहे. यामध्ये ग्रामपविकास पॅनलचे श्वेता मोरे, सोमनाथ जारस, शंकर ढेरिंगे, प्रा. ज्ञानेश्वर गायकवाड,संजय मुठाळ,शोभा लोहकरे,विमल मुठाळ व गायत्री काळे तर परिवर्तन पॅनलचे संपत लोहकरे, अर्चना पाळदे,निवृत्ती मुठाळ,कविता मुठाळ,किरण गायकवाड, माधुरी गायकवाड हे विजयी झाले तर, गोटीराम सूर्यवंशी हे अपक्ष निवडून आले आहेत.
लोहशिंगवेपहिलवान भगवान जुंद्रे व ॲड. त्रंबक जुंद्रे, अशोक मोरे यांचे श्री शेतकरी विकास पॅनलची आणि सत्ताधारी गटाचे सरपंच संतोष जुंद्रे यांनी नवचैतन्य पॅनल यांच्यात लढत झाली. त्यात अविनाश राजाराम वाघचौरे,योगिता युवराज जुंद्रे, युवराज भगवान जुंद्रे,सुनीता कैलास पाटोळे,कविता किरण जुंद्रे, ताराबाई अंबादास जुंद्रे हे निवडून आले.
वंजारवाडी ग्रामपंचायतीच्या नऊ जागांसाठी १८ उमेदवार रिंगणात होते. सत्ताधारी महाविकास आघाडी व आपला पॅनलमध्ये दुरंगी लढत झाली. यात तुकाराम शिंदे,ज्ञानेश्वर शिंदे,अशोक मुसळे,भाऊसाहेब शिंदे आदींच्या नेतृत्वाखालील आपला पॅनलने आठ जागा जिंकल्या. त्यात ज्ञानेश्वर रामदास शिंदे,मनीषा रामहरी शिंदे,ज्योती योगेश लोहारे,बाळू गणपत लोहारे, मंदा चंद्रभान शिंदे,ज्ञानेश्वर कारभारी शिंदे, तुकाराम दगडू शिंदे,जयश्री संजय म्हसळे तर सत्ताधारी महाविकास आघाडीचे अनिता बोथे या एकमेव उमेदवार विजयी झाल्या. तर याच पॅनलच्या विद्यमान सरपंच कमल अशोक कातोरे यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
दोनवाडे ग्रामपंचायतीत माजी सरपंच अशोक ठुबेंच्या पॅनलने सलग चौथ्यांदा विजय मिळविला. ग्रामपंचायतीच्या ७ जागांसाठी १४ उमेदवार रिंगणात होते. राष्ट्रवादी नेते अशोक ठुबे यांच्या नेतृत्वाखाली पॅनलने ४ जागा जिंकून सत्ता राखली आहे.विद्यमान सरपंच शैला अशोक ठुबे यांच्यासह नंदा शांताराम बोराडे,बाळासाहेब रघुनाथ ठुबे,सविता भाऊसाहेब शिरोळे हे विजयी झाले. तर बोराडे-शिरोळे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या पॅनलचे मीरा भिवाजी कांगणे,उत्तम पोपट पवार,नर्मदा सोपान सांगळे हे तीन उमेदवार विजयी झाले.
नानेगावमध्ये ग्रामपंचायतीच्या ९ पैकी २ जागा बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित ७ जागांसाठी २१ उमेदवार रिंगणात होते. त्यात परिवर्तन पॅनलचे वासुदेव पोरजे,भारती राजाराम शिंदे, संपत केरू बर्डे,ज्ञानेश्वर सहादु शिंदे,वर्षा संदीप आडके तर ग्रामपविकास पॅनलचे काळू निवृत्ती आडके,अशोक सखाराम आडके, अनिता कैलास आडके तर विमल भगवान आडके या अपक्ष उमेदवार विजयी झाल्या, तर आशा सुनील मोरे व नंदिनी संजय काळे या बिनविरोध निवडून आल्या आहेत.
शेवगेदारणात संमिश्र
येथील ग्रामपंचायतीच्या ९ पैकी २ जागा बिनविरोध झाल्या होत्या.या ठिकाणी स्वतंत्र लढती झाल्या. त्यात ७ जागांसाठी १८ उमेदवार रिंगणात होते. त्यात अशोक भागुजी पाळदे, हिरामण दत्तात्रय पाळदे, मीराबाई ज्ञानेश्वर कासार,दामिनी शिवाजी कासार,पुष्पा गजीराम कासार, दीपक मधुकर कासार,सविता किरण कासार हे विजयी झाले तर, मीना प्रभाकर कासार व अरुण माळी हे बिनविरोध निवडून आले आहेत.
बेलतगव्हाण नवोदितांच्या हाती
येथील ग्रामपंचातीच्या ९ पैकी ३ जागा बिनविरोध झाल्या होत्या, तर उर्वरित ६ जागांसाठी १७ उमेदवार रिंगणात होते.ग्रामपंचायतीत स्वतंत्र लढती झाल्या. त्यात आकाश अशोक पागेरे, सुरेखा ज्ञानेश्वर पाळदे,कांचन विष्णू घोडे, ताराचंद जगन्नाथ पाळदे, अतुल दत्तात्रय पाळदे, मोनीश वसंत दोंदे हे निवडून आले असून, पुष्पा धुर्जड, निकिता मोहन पाळदे, सिंधूबाई देवराम पवार या बिनविरोध निवडून आल्या आहेत.