विंचूर येथे होणार ट्रान्सफार्मर भवन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 01:26 PM2018-02-27T13:26:36+5:302018-02-27T13:26:36+5:30
येवला/विंचूर - येवला मतदारसंघातील लासलगांव-विंचूर परिसरातील विद्युत रोहित्र जळाल्यानंतर शेतकºयांना लवकरात लवकर सुस्थितीमधील नवीन रोहित्र उपलब्ध होण्यासाठी जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेतील नाविन्यपूर्ण योजनेतून विंचूर येथे ट्रान्सफार्मर भवन मंजूर झाले आहे.
येवला/विंचूर - येवला मतदारसंघातील लासलगांव-विंचूर परिसरातील विद्युत रोहित्र जळाल्यानंतर शेतकºयांना लवकरात लवकर सुस्थितीमधील नवीन रोहित्र उपलब्ध होण्यासाठी जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेतील नाविन्यपूर्ण योजनेतून विंचूर येथे ट्रान्सफार्मर भवन मंजूर झाले आहे. ग्रामीण भागातील रोहित्र जळाले किंवा नादुरु स्त झाले तर त्याठिकाणी नवीन सुस्थितीमधील रोहित्र लवकर बसविण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी ट्रान्सफार्मर भवन उभारण्याचा महावितरण कंपनीने निर्णय घेतला आहे. निफाड तालुक्यात विंचूर येथे ट्रान्सफार्मर भवन उभारण्यासाठी छगन भुजबळ यांनी जिल्हाधिकाºयांशी आर्थर रोड कारागृहातून पत्रव्यवहार केलेला होता. त्यामुळे विंचूर येथे ट्रान्सफार्मर भवन बांधण्यासाठी जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेतील नाविन्यपूर्ण योजनेतून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. लवकरच या कामाला सुरु वात होणार आहे. सदर ट्रान्सफार्मर भवनासाठी सुमारे ५२.३५ लाख रूपये खर्च येणार आहे. लासलगांव-विंचूर परीसरातील गावांमधील रोहित्र जळाले किंवा नादुरु स्त झाले तर ते जमा करण्यासाठी आणि नवीन रोहित्रासाठी चांदवड-नाशिकला जावे लागत असे. मात्र आता विंचूर येथे ट्रान्सफार्मर भवन होत असल्यामुळे शेतकर्यांची सोय होणार आहे. विंचूर येथे उभारण्यात येणाºया या ट्रान्सफार्मर भवनाचे बांधकाम झाल्यानंतर येथे अद्ययावत तंत्रज्ञान व मशिनरी उपलब्ध होणार आहे.