पत्रकारितेच्या प्रश्नपत्रिकेत भाषांतराची चूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2019 01:42 AM2019-11-05T01:42:28+5:302019-11-05T01:42:46+5:30
नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने पत्रकारिता व जनसंज्ञापन विभागाच्या तिसऱ्या सत्रातील ‘मीडिया रिसर्च मेथड्््स’ म्हणजेच ‘माध्यम संशोधन पद्धती’ या विषयाच्या सोमवारी झालेल्या परीक्षेमध्ये भाषांतराची गंभीर चूक झाल्याने परीक्षार्थींचा गोंधळ उडाला.
नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने पत्रकारिता व जनसंज्ञापन विभागाच्या तिसऱ्या सत्रातील ‘मीडिया रिसर्च मेथड्््स’ म्हणजेच ‘माध्यम संशोधन पद्धती’ या विषयाच्या सोमवारी झालेल्या परीक्षेमध्ये भाषांतराची गंभीर चूक झाल्याने परीक्षार्थींचा गोंधळ उडाला. यामुळे परीक्षेदरम्यान विद्यार्थी या प्रकारामुळे बुचकळ्यात पडले होते.
माध्यम संशोधन पद्धती या तिसºया सत्रातील विषयाची परीक्षा नुकतीच पार पडली. मात्र प्रश्नपत्रिकेतील पहिल्याच प्रश्नात ‘कॉन्टिटेटिव्यू’ या शब्दाचे भाषांतर ‘गुणात्मक’ असे करण्यात आले होते. मात्र वास्तविक या शब्दाचा अर्थ ‘संख्यात्मक’ असे असणे गरजेचे होते. पहिल्याच प्रश्नात झालेल्या या चुकीमुळे विद्यार्थी काही वेळ गोंधळात पडले होते. इंग्रजी माध्यमाच्या परीक्षार्थींनी संख्यात्मक अर्थाने प्रश्नाचे उत्तर लिहिले असेल तर मराठी माध्यमाच्या परीक्षार्थींनी गुणात्मक अर्थाने उत्तर लिहिले असेल. मात्र सूचनेप्रमाणे इंग्रजी प्रश्नपत्रिका प्रमाण मानवी अशी सूचना करण्यात आली असल्याने इंग्रजी माध्यमाच्या परीक्षार्थींनी ‘संख्यात्मक’ अर्थाने उत्तर लिहिणे अपेक्षित आहे. जर त्यांनी मराठी प्रश्नपत्रिकेनुसार उत्तर लिहिले असेल तर ते चुकीचे ठरेल. २५ गुणांच्या या प्रश्नपत्रिकेतील हा प्रश्न १५ गुणांचा असल्याने याविषयात उत्तीर्ण होण्यासाठी या प्रश्नाला गुण मिळणे गरजेचे आहे. यामुळे विद्यापीठाने या चुकीची दखल घेऊन ‘संख्यात्मक’ आणि ‘गुणात्मक’ अर्थाच्या उत्तरांना समान मानून उत्तरपत्रिका तपासल्या तर परीक्षार्थींचे नुकसान होणार नाही. त्यामुळे विद्यापीठाने याची दखल घ्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.