कोमलवाडी परिसरात बिबट्यासह बछड्यांचा संचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 09:53 PM2020-03-16T21:53:28+5:302020-03-16T21:54:37+5:30
सिन्नर : तालुक्याच्या पूर्व भागातील कोमलवाडी शिवारात बिबट्यासह दोन बछड्यांचा मुक्त संचार असून, परिसरातील अनेक शेतकऱ्यांना त्यांचे दर्शन झाल्याने सर्वत्र दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने तातडीने पिंजरा लावण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

कोमलवाडी शिवारातील कडवा कॅनॉलच्या २९ क्रमांक चारीलगत विश्राम भिकाजी बोºहाडे यांच्या मक्याच्या शेतामध्ये शनिवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास बिबट्या बछड्यासह दिसून आला. राजेंद्र जोरी व नामदेव सैंद या शेतकºयांनी मकाच्या शेतात बिबट्या जाताना बघितला. शिवाय मका पिकाच्या शेजारीच कांद्याची निंदणी करीत असलेल्या काही महिलांनादेखील बिबट्याचे दर्शन झाले आहे. आठ दिवसांपूर्वी कसारी नाला शिवारात त्याचे वास्तव्य होते; परंतु आता गावाच्या फक्त अर्धा किलोमीटर अंतरावर बिबट्या आल्याने परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
रात्रीचा वीजपुरवठा असल्याने शेतकºयांना पिकांना पाणी देण्यासाठी शेतात जावे लागते. परंतु बिबट्याच्या दहशतीमुळे रात्री घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे. परिसरात ऊस आणि मका या पिकांची मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, त्यामुळे बिबट्याला लपण्यासाठी जागा मिळाली आहे. या भागात तत्काळ पिंजरा लावावा, अशी मागणी सरपंच संपत सैद यांनी वनविभागाच्या कर्मचाºयांशी संपर्क साधून केली आहे.