परिवहन विभागाच्या बसेसची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2020 05:12 PM2020-02-03T17:12:01+5:302020-02-03T17:12:09+5:30

देवळा : मेशी येथील बस दुर्घटनेत २६ प्रवाशांचा बळी गेल्यानंतर प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीद वापरून सेवा देणारे एसटी महामंडळ नागरिकांना कशा प्रकारची सेवा देते, याबाबत प्रश्न उपस्थित झाला आहे. बस प्रवास धोक्याचा झाला आहे. वाहतूक नियंत्रण व्यवस्थेतील त्रुटीमुळे नाराजी व्यक्त होत आहे. याबाबत प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. बेशिस्त आणि बेदरकार वाहनचालक, बसेची दुरवस्था, दुरु स्तीकडे दुर्लक्ष, आधुनिक बसेसचा अभाव, वाहतूक नियंत्रण व्यवस्थेतील त्रुटी याबरोबरच वाहने सुरक्षिततेने चालविण्याबाबत उदासीनता अशा अनेक कारणांमुळे राज्य परिवहन महामंडळाबाबत प्रवाशांमध्ये नाराजी दिसून येते.

 Transport Department buses | परिवहन विभागाच्या बसेसची दुरवस्था

परिवहन विभागाच्या बसेसची दुरवस्था

googlenewsNext
ठळक मुद्दे प्रवास धोक्याचा : वाहतूक नियंत्रण व्यवस्थेतील त्रुटींमुळे नाराजी.रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनचालकांमध्येदेखील एसटीतून प्रवासाविषयी भीती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीतून नागरिकांच्या रागाचा उद्रेक झालाच तर मग एसटीचालकास शिवीगाळ किंवा कधी म

. यामुळे बसची होणारी दुरवस्था आणि प्रवाशांना होणारा त्रास याचा खासगी प्रवासी वाहतूकदारांना लाभ होताना दिसतो. बसच्या दुरवस्थेकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नाही ही चिंतेची बाब आहे. राज्य परिवहन महामंडळाने अपघात न करणाºया वाहनचालकांचा त्यांच्या सेवानिवृत्ती वेळी सत्कार केले. त्यामुळे परिस्थिती बदलावी अशी केलेली अपेक्षादेखील फोलच ठरली आहे, परिस्थिती दिवसेंदिवस बिकटच होत चालली आहे. सर्वात मोठ्या सार्वजनिक प्रवासी सेवांमध्ये गणल्या जाणाºया महाराष्ट्राच्या एसटी महामंडळाच्या सर्व बसगाड्या महामार्गावरूनच काय साध्या खड्डेमय रस्त्यातूनही सुसाट धावत असतात. आणि यावेळी प्रवासी जीव मुठीत धरून बसलेले असतात. बसच्या अशा अवस्थेमुळेच एसटीकडे अनेक प्रवाशांनी पाठ फिरवली आहे. यामुळे एसटी महामंडळालाच याचा अधिक फटका बसत आहे.
**मेशी येथे धुळे-कळवण या कळवण आगाराच्या बसला अपघात झाला. ती बस २०१३ सालातील असून, आतापर्यंत आठ लाख आठ हजार ५२९ कि.मी. फिरलेली आहे. एप्रिल २०१८मध्ये या बसला फिटनेस प्रमाणपत्र मिळाले होते व मे २०२१पर्यंत ते वैध असल्याचे समजते..(03देवळाएसटी)

 

Web Title:  Transport Department buses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.