भरारी पथकाने रोखली अवैध मद्याची वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 12:11 AM2018-09-16T00:11:47+5:302018-09-16T00:34:04+5:30
द्वारका परिसरातून अवैधरीत्या प्रतिबंधित विदेशी मद्याची वाहतूक केली जाणार असल्याची गोपनीय माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथक-१ला मिळाली. त्यानुसार पथकातील कर्मचाऱ्यांनी द्वारकेवर सापळा रचला. यावेळी संशयित नरेश पेरुमल नागपाल (रा. देवळाली कॅम्प) हा राज्यात प्रतिबंधित असलेला मद्यसाठा विक्री करण्याच्या उद्देशाने वाहनातून नेत असताना आढळून आला. पथकाने वाहन रोखून त्यास ताब्यात घेत मद्यसाठा जप्त केला.
नाशिक : द्वारका परिसरातून अवैधरीत्या प्रतिबंधित विदेशी मद्याची वाहतूक केली जाणार असल्याची गोपनीय माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथक-१ला मिळाली. त्यानुसार पथकातील कर्मचाऱ्यांनी द्वारकेवर सापळा रचला. यावेळी संशयित नरेश पेरुमल नागपाल (रा. देवळाली कॅम्प) हा राज्यात प्रतिबंधित असलेला मद्यसाठा विक्री करण्याच्या उद्देशाने वाहनातून नेत असताना आढळून आला. पथकाने वाहन रोखून त्यास ताब्यात घेत मद्यसाठा जप्त केला.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, भरारी पथकाने नरेश नागपाल यास ताब्यात घेतल्यानंतर त्याची कसून चौकशी केली असता देवळाली कॅम्प परिसरात राहणाºया किरपाल फत्तेचंद नागपाल याच्याकडून खरेदी केल्याची माहिती दिली. त्यानुसार भरारी पथकाने देवळाली कॅम्प गाठून किरपालच्या राहत्या घरी छापा मारला. त्याच्या चारचाकी व दुचाकीमधून पथकाने सुमारे १ लिटरच्या ११० मद्याच्या (स्कॉच) भरलेल्या बाटल्या हस्तगत केल्या. या संपूर्ण मुद्देमालाची किंमत सुमारे ९ लाख ५० हजार रुपये असल्याचे उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले. या गुन्ह्यात वापरलेल्या दोन चारचाकी व दोन दुचाकीदेखील जप्त करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे किरपाल याने हे विदेशी मद्य आंतरराष्टÑीय विमानतळावरून कर चुकवेगिरी करून देवळाली कॅम्प परिसरात आणले असल्याची धक्कादायक माहिती चौकशीत दिली आहे. त्यानुसार पथकाकडून या मद्याची पडताळणी सुरू असून दिलेल्या माहितीत कितपत सत्त्यता आहे, हे पडताळून बघितले जात आहे. विदेशी मद्य बनावटदेखील असण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी त्या दिशेनेही तपास करीत आहेत. या कारवाईत निरीक्षक मधुकर राख, प्रवीण मंडलिक, वीरेंद्र वाघ, अरुण सुत्रावे, सुनील पाटील आदींनी सहभाग घेतला.