इंधन दरवाढीमुळे ट्रान्सपोर्ट उद्योग अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:27 AM2021-02-21T04:27:16+5:302021-02-21T04:27:16+5:30
नाशिक : जिल्ह्यातील सुमारे एक हजार ते अकराशे ट्रान्सपोर्ट कंपन्या डिझेल दरवाढीमुळे अडचणीत आल्या आहेत. ही दरवाढ अशीच होत ...
नाशिक : जिल्ह्यातील सुमारे एक हजार ते अकराशे ट्रान्सपोर्ट कंपन्या डिझेल दरवाढीमुळे अडचणीत आल्या आहेत. ही दरवाढ अशीच होत राहिली तर अनेक व्यावसायिकांसमोर आर्थिक संकट उभे राहण्याची स्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत असून, त्यामुळे हजारो कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळण्याची भीती व्यक्त होत आहे.
जिल्ह्यात नाशिकसह मालेगाव, सिन्नरसारख्या औद्योगिक वसाहतींच्या परिसरात ट्रान्सपोर्ट कंपन्यांचे प्रमाण अधिक आहेत. जिल्ह्यातील सुमारे एक हजार ते अकराशे ट्रान्सपोर्ट कंपन्यांपैकी केवळ नाशिक शहरातच जवळपास चारशे ते पाचशे ट्रान्सपोर्ट कंपन्या असून, लहान-मोठ्या मालवाहू करणाऱ्या वाहनांची संख्या तब्बल साडेसहा ते सात हजारांहून अधिक आहे. यात प्रामुख्याने कांदा, द्राक्षासारख्या कृषिमालासह औद्योगिक मालाची वाहतूक होते. त्यासाठी व्यावसायिकांना व्यापारी आणि उत्पादकांसोबत वर्ष सहा महिन्यांच्या कालावधीसाठी करार करावा लागतात. परंतु, इंधनाच्या दरात रोज होणारे बदल वाहतूकदार व्यावसायिकांसाठी डोकेदुखी ठरत असून, अशाप्रकारे करार करताना ट्रान्सपोर्ट कंपन्यांना कसरत करावी लागत आहे. यात डिझेलच्या वाढणाऱ्या किमतींमुळे अनेकदा ट्रान्सपोर्ट कंपन्यांना आर्थिक फटका सहन करावा लागतो आहे.
गेल्या चार वर्षांत डिझेल दरांमध्ये ६० रुपयांपासून ८७ रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. त्या तुलनेत ट्रान्सपोर्ट कंपन्यांना अपेक्षित भाडेवाढ मिळालेली नाही. त्यामुळे ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांना घाटा सहन करावा लागतो आहे. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात दोन ते तीन महिने गाड्या बंद होत्या. आता टाळेबंदी शिथिल होत असताना डिझेल दरवाढीमुळे पुन्हा वाहतूक व्यावसाय अडचणीत आला आहे. ही दरवाढ आटोक्यात आली नाही, तर अनेक लघु उद्योजकांच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त होत असून, या संकटातून ट्रान्सपोर्ट उद्योग वेगळीच बाहेर पडला नाही तर ड्रायव्हर, क्लिनर, पासून बँका आणि खासगी कंपन्यांनाही या दृष्टचक्राचा सामना करावा लागण्याचे संकेत दिसून येत आहे.
कोट-
मालवाहतूक भाडे निश्चितीसाठी मार्गदर्शक नियमावली नाही. त्यामुळे रोज बदलणाऱ्या इंधनाच्या दरामुळे वाहतूक भाडे करार करण्याची व्यावसायिकांना कसरत कारावी लागत असून, सरकारने ठरावीक कालावधीच्या अंतराने पेट्रोल, डिझेलचे दर एकदाच कमी किंवा वाढविणे आवश्यक आहे. त्यामुळे करार करणे सोपे होईल.
राजेंद्र फड, अध्यक्ष, नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएनशन.
असा बसला फटका
नाशिक ते इंदौर ४५० किलोमीटर
१२ टायर ट्रक माल वाहतूक २५ टन
प्रतिटन मिळणार दर १५०० रुपये
एकूण भाडे ३७ हजार रुपये
चालक भत्ता व टोल ३०००
हमाली -४५००