परिवहन मंत्र्यांची आरटीओ कार्यालयाला भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:14 AM2021-03-28T04:14:25+5:302021-03-28T04:14:25+5:30

दोन दिवसांपूर्वीच परब प्रादेशिक परिवहन कार्यालयात भेट देणार होते मात्र काही कारणास्तव त्यांचा दौरा रद्द करण्यात आला होता. शनिवारी ...

Transport Minister visits RTO office | परिवहन मंत्र्यांची आरटीओ कार्यालयाला भेट

परिवहन मंत्र्यांची आरटीओ कार्यालयाला भेट

Next

दोन दिवसांपूर्वीच परब प्रादेशिक परिवहन कार्यालयात भेट देणार होते मात्र काही कारणास्तव त्यांचा दौरा रद्द करण्यात आला होता. शनिवारी दुपारी परब यांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयात येऊन देशभरातील पहिल्या व राज्यातील केवळ नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयात असलेल्या एकमेव स्वयंचलित वाहन तपासणी केंद्राची पाहणी करून संचलित केंद्रावर कशाप्रकारे वाहन तपासणी केली जाते याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे यांच्याकडून जाणून घेतली. राज्यात केवळ नाशिकला प्रादेशिक परिवहन कार्यालयात स्वयंचलित वाहन तपासणी केंद्र असून शासन राज्यातील अन्य जिल्ह्यात असलेल्या परिवहन कार्यालयात देखील स्वयंचलित वाहन तपासणी केंद्र सुरू करण्याच्या विचारात आहे. त्याच पार्श्वभूमीवर शनिवारी परब यांनी नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयात भेट देत संचलित वाहन तपासणी केंद्राची पाहणी केली यावेळी परब यांनी कोरोना पार्श्वभुमीवर प्रादेशिक परिवहन कार्यालयात कशाप्रकारे काळजी घेतली जाते काय काय उपाय योजना केल्या आहेत याची माहिती जाणून घेत कार्यालयात वाहनसंबंधी कामासाठी आलेल्या नागरिकांची कामे वेळेत करावी तसेच मनुष्यबळ वाढवावे अशा सूचनाही दिल्या.

Web Title: Transport Minister visits RTO office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.