आॅक्सिजनची वाहतूक करणा-या वाहनांना रूग्णवाहिकांचा दर्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 10:40 PM2020-09-14T22:40:47+5:302020-09-15T01:26:12+5:30
नाशिक- ऐन कोरोनाच्या संकट काळात नाशिकमध्ये आॅक्सिजनची टंचाई जाणवत आहे. त्यामुळे आॅक्सिजन वेळेत मिळावा यासाठी यासाठी जिल्'ात आॅक्सिजन टॅँकर व सिलिंडरची वाहतूक करणा-या वाहनांना रूग्ण वाहिकेचा दर्जा देण्यात येणार आहे. या वाहनांना रूग्णवाहिकेसंदर्भातील सर्व नियम लागु करण्यात येणार आहे. यांसदर्भात जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सर्व अधिका-यांना सूचना दिल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक- ऐन कोरोनाच्या संकट काळात नाशिकमध्ये आॅक्सिजनची टंचाई जाणवत आहे. त्यामुळे आॅक्सिजन वेळेत मिळावा यासाठी यासाठी जिल्'ात आॅक्सिजन टॅँकर व सिलिंडरची वाहतूक करणा-या वाहनांना रूग्ण वाहिकेचा दर्जा देण्यात येणार आहे. या वाहनांना रूग्णवाहिकेसंदर्भातील सर्व नियम लागु करण्यात येणार आहे. यांसदर्भात जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सर्व अधिका-यांना सूचना
दिल्या आहेत. आॅक्सिजनची वाहतूक आणि उपलब्धता यात सुलभता आणण्यासाठी अधिका-यांची समिती गठीत करण्यात आली आहे
मुंबई पुणे आणि अन्य ठिकाणहून नाशिकमध्ये द्रवरूप आॅक्सिजन पुरवले जाते आणि नंतर जिल्'ात देखील वितरीत होते. सध्या उत्पादनाच्या मर्यादा आणि त्यानंतर वाहतूकीत येणाऱ्या अडचणी, गर्दी तसेच वाहतूक कोंडीयामुळे आक्सिजन पुरवठ्याबाबत सोमवारी (दि.१४) जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित विविध शासकिय विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी
या सूचना केल्या. नाशिक शहर, ग्रामीण भागआणि मालेगावमध्ये रूग्णांचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे याठिकाणी मोठ्या मध्यम आणि लहान रूग्णालयात आॅक्सिजनची प्रतिदिन आवश्यकता किती असते याबाबत अतिरीक्त जिल्हा शल्य चिकित्सकांनी प्रत्यक्ष वापराची माहिती संकलीत करावी तसेच त्यानुसार आॅक्सिजन पुरवठ्याचे नियोजन करावे असे आदेश जिल्हाधिका-यांनी दिले. यांसदर्भातील दैनंदिन अहवाल आपत्कालीन विभागाला देण्याच्या सूचनाही त्यांंना करण्यात आल्या.
आॅक्सिजन उत्पादकांवर राहणार नजर
आॅक्सिजनची निर्मिती करणाºया उद्योगांवर लक्ष ठेवण्यासाठी खास पथके गठीत करण्यात येणार असून ज्या उद्योगांच्या आॅक्सिजन वापरावर मर्यादा घालण्यात आल्या आहेत. त्या उद्योगांना परस्पर आॅक्सिजन पुरवठा होणार नाही याबाबत सतत पडताळणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिल्या आहेत.