मनपा शाळेतील विद्यार्थ्यांनी घेतले वाहतुकीचे प्रशिक्षण
By Admin | Published: August 27, 2016 10:37 PM2016-08-27T22:37:08+5:302016-08-27T22:37:32+5:30
मनपा शाळेतील विद्यार्थ्यांनी घेतले वाहतुकीचे प्रशिक्षण
सातपूर : येथील महापालिकेच्या विद्यानिकेतन शाळा क्रमांक ८ मधील विद्यार्थ्यांनी चिल्ड्रन ट्रॅफिक एज्युकेशन पार्कला भेट देऊन वाहतूक नियमांचे प्रशिक्षण घेतले. भविष्यात वाहतूक नियमांचे पालन करण्याची हमी दिली.
महानगरपालिका आणि महिंद्रा राइज यांच्या संयुक्त विद्यमाने सातपूर कॉलनीतील विद्यानिकेतन शाळा क्र . ८ मधील ५ वी ते ८ वी च्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. प्रशिक्षक साहेबराव खरात यांनी विद्यार्थ्यांना वाहकाची वाहन चालविण्याची पद्धत, नियम, रस्त्यावरील पांढरे पट्टे व त्यांचा वापर, सिग्नलचा वापर याविषयी माहिती दिली. प्रशिक्षक सुरेंद्र कुलकर्णी यांनी वाहतुकीचे नियम, विविध चिन्ह व वाहन चालवताना त्यांचा वापर, हॉर्न वाजविणे, रोड क्र ॉस याविषयी मार्गदर्शन केले.
प्रत्यक्ष रस्त्यावर वाहतुकीच्या नियमांचे पालन कसे करावे याची माहिती दिली. यावेळी केंद्रप्रमुख रोहिदास गोसावी, सोनजी गवळी, वैभव अहिरे, सुरेश खांडबहाले, सोनिया बोरसे, बेबी शिंदे, यशवंत जाधव, सुरेश चौरे, पुनाजी मुठे, पल्लवी भुसे, शारदा सोनवणे उपस्थित होते. (वार्ताहर)