कत्तलीच्या हेतूने जनावरांची वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:11 AM2020-12-27T04:11:23+5:302020-12-27T04:11:23+5:30

विशेष गोवंश पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे यांना एका पिकअप वाहनातून जनावरे येत असल्याची गुप्त माहिती मिळाली ...

Transportation of animals for slaughter purposes | कत्तलीच्या हेतूने जनावरांची वाहतूक

कत्तलीच्या हेतूने जनावरांची वाहतूक

Next

विशेष गोवंश पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे यांना एका पिकअप वाहनातून जनावरे येत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे, हवालदार वसंत महाले, प्रमोद मंडलिक,शशिकांत शिरोळे, गौतम बोराळे,कोळी यांनी नुरबाग भागातील सुफिया बगीचाजवळ पिकअप (क्रमांक एम एच ०४ ई.एल.४९३५) थांबवून तपासणी केली असता त्यात शेती उपयोगी सहा गोवंश जातीचे जनावरे जखडून बांधलेल्या अवस्थेत आढळून आली. याप्रकरणी वाहन चालक आदिल शेख अख्तर (२०) रा.पाच पंजतन चौक, आयेशा नगर यास ताब्यात घेण्यात आले आहे तर फजलू रहेमान लुकमान खान रा.कमालपुरा व मालक अर्शद (पूर्ण नाव माहीत नाही)हे फरार आहेत. एक लाख ९५ हजारांची जनावरे व दोन लाख ५० हजार रुपये किमतीची पिकअप वाहन असा एकूण चार लाख ४५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अधिक तपास आयेशा नगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पवार करीत आहेत.

Web Title: Transportation of animals for slaughter purposes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.