कत्तलीच्या हेतूने वाहतूक; सात जनावरे जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 00:53 IST2020-12-24T23:11:39+5:302020-12-25T00:53:20+5:30
मालेगाव मध्य: महामार्गावरील सागर वजन काटा येथे पहाटे पाचच्या सुमारास गोवंशाची अवैध वाहतूक करणाऱ्या दोन जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून सात जनावरे व पिकअप असा ३ लाख ६९ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

कत्तलीच्या हेतूने वाहतूक; सात जनावरे जप्त
मालेगाव मध्य: महामार्गावरील सागर वजन काटा येथे पहाटे पाचच्या सुमारास गोवंशाची अवैध वाहतूक करणाऱ्या दोन जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून सात जनावरे व पिकअप असा ३ लाख ६९ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे विशेष पोलीस पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे हवालदार वसंत महाले, प्रमोद मंडलिक, शशिकांत शिरोळे, गौतम बोराळे, कोळी यांनी पहाटेच्या सुमारास महामार्गावरील सागर वजन काटा येथे जखडून बांधलेल्या १ लाख १९ हजार रुपये किमतीची सात जनावरे व २ लाख ५० हजारांची पिकअप (एम एच १८ एम ९०५५) असा ३ लाख ६९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी वाहनचालक मुस्तफा खान अफजल खान रा. नया फारान हॉस्पिटलसमोर, शेख आबिद शेख फय्याज (२४)रा. पवारवाडी या दोघांना अटक केली असून युसुफ खान जाबीर खान (३८) रा. मोमीनपुरा, सलमान खान (२३) रा. मोमीनपुरा व बब्बू खान इब्राहीम खान (२५) रा. कुरेशी मोहल्ला हे फरार आहेत.