ई वे बिल प्रणालीनुसार वाहतुकीला सुुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 01:01 AM2018-04-03T01:01:11+5:302018-04-03T01:01:11+5:30
एका राज्यातून दुसऱ्या राज्यात ५० हजारांहून अधिक किमतीच्या मालाची वाहतूक करताना वाहतूकदारांना रविवार (दि.१) पासून ई वे बिल सोबत ठेवावे लागणार असल्याने नाशिक शहरातील विविध वाहतूक व लॉजिस्टिक व्यावसायिकांनी ई वे बिल प्रणालीनुसार वाहतुकीला सुरुवात केली आहे.
नाशिक : एका राज्यातून दुसऱ्या राज्यात ५० हजारांहून अधिक किमतीच्या मालाची वाहतूक करताना वाहतूकदारांना रविवार (दि.१) पासून ई वे बिल सोबत ठेवावे लागणार असल्याने नाशिक शहरातील विविध वाहतूक व लॉजिस्टिक व्यावसायिकांनी ई वे बिल प्रणा लीनुसार वाहतुकीला सुरुवात केली आहे. ई वे बिल प्रणाली जीएसटीएन पोर्टलशी संलग्न असल्याने या यंत्रणेमुळे रोख कर भरण्यातून होणाºया कर चोरीला आळा बसून, कर महसुलात वाढ होणार आहे. परंतु, वाहतूक लॉजिस्टिक व ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांना संकेत स्थळाचा संथ प्रतिसाद व कुशल मनुष्यबळाअभावी विविध समस्यांचा सामना करावा लागत असून, व्यावसायिकांकडून ई वे बिल प्रणाली अधिक सोपी व सोयिस्कर करण्याची मागणी होत आहे. माल वाहतूकदारांना जीएसटीएन पोर्टलला संलग्न असलेले ई-वे बिल उपलब्ध होणार असून, ही प्रणाली एनआयसी (नॅशनल इन्फ ॉर्मेशन सेंटरद्वारे) नियंत्रित होणार आहे. परंतु या प्रणालीच्या अंमलबजावणीत पहिल्याच दिवशी व्यावसायिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागला. ई वे बिल प्रणाली १ एप्रिलपासून लागू झाली असली तरी रविवारी वाहतूकदार संस्था व लॉजिस्टिक संस्था बंद असल्याने खºया अर्थाने सोमवारपासून या बिल प्रणालीची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यामुळे सोमवारी सायंकाळपर्यंत अनेक व्यावसायिकांनी बिले तयार केली नसली तरी ज्या व्यावसायिकांनी बिले तयार करण्याचा प्रयत्न केला त्यांना धीम्या गतीने चालणाºया संकेतस्थळामुळे बिल तयार करण्यात अडचणी आल्या. त्यातच ही बिल प्रणाली व्यावसा यिकांसाठी नवीन असल्याने त्यांच्याकडे या यंत्रणेची माहिती असलेला कर्मचारी वर्ग नसल्यानेही पहिल्यांदाच ई वे बिल तयार करताना समस्या आल्याचे लॉजिस्टिक व्यावसायिक एम. पी. मित्तल यांनी सांगितले. देशात रस्ते, रेल्वे, हवाई आणि जलवाहतुकीच्या माध्यमातून होणाºया मालवाहतुकीला ई वे बिल बंधनकारक करण्यात आले असून, ही बिल प्रणाली फेब्रुवारीमध्येच लागू करण्यात येणार होती. परंतु, काही राज्यांमध्ये तांत्रिक अडचणी आल्याने अंमलबजावणी रखडली होती. आता जीएसटीएन यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याचा दावा सरकारने केला आहे. १ एप्रिलपासून राज्यातील मालवाहतूक आणि १५ एप्रिलपासून राज्यांतर्गत मालवाहतुकीला ई वे बिल लागू झाले असून या पोर्टलवरून रोज ७५ लाख बिले तयार होतील, असा विश्वास सरकारतर्फे व्यक्त करण्यात आला असला तरी पहिल्याच दिवसी संकेतस्थळावरून संथ प्रतिसाद मिळत असल्याने संकेतस्थळाच्या क्षमतेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
ई वे बिल प्रणाली नवीन असल्याने वाहनांना रस्त्यात व मालाच्या डिलिव्हरीत येणाºया अडचणींपासून व्यावसायिक आतापर्यंत अनभिज्ञ आहेत.या बिल प्रणालीनुसार बिले तयार करणारे मनुष्यबळ उपलब्ध नसून, अनेक व्यावसायिकांनी त्यांच्या संस्थांचे संगणकीकरण केलेले नाही. तर काही व्यावसायिकांकडे इंटरनेटची सुविधा उपलब्ध नाही. ई वे बिलचे संकेतस्थळही अतिशय संथ प्रतिसाद देत असल्याने बिले तयार करताना अडचणी येत आहेत. - एम. पी. मित्तल, मित्तल लॉजिस्टिक प्रा. लि.
ई वे बिल प्रणाली रविवारपासून लागू झाली. परंतु रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने खºया अर्थाने सोमवारपासून या प्रणालीअंतर्गत काम सुरू झाले आहे. सोमवारी माल भरून निघालेली वाहने ई वे बिल घेऊनच निघणार आहेत. ही वाहने सकाळपासून लोडिंगचे काम सुरू असल्याने प्रत्यक्षात बिलिंग आणि रस्त्यात येणाºया अडचणींविषयी पुढीत दोन ते तीन दिवसांत अधिक चित्र स्पष्ट होईल.
- अंजू सिंघल, जिल्हा माल वाहतूकदार संघटना, नाशिक