पिंपळगावी भाडेवाढीसाठी वाहतूकदारांचा संप सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2020 10:19 PM2020-09-08T22:19:35+5:302020-09-09T00:50:11+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पिंपळगाव बसवंत : सहा वर्षांपासून मागणी करूनही भाडेवाढ केली नसल्याने पिंपळगाव बसवंत ट्रक-टेम्पो चालक-मालक संघटनेच्या वतीने मंगळवारपासून (दि. ८) संपाचे हत्यार पुकारले. जोपर्यंत मागणी पूर्ण होऊ शकत नाही, तोपर्यंत संप मागे घेणार नसल्याचा इशारा देण्यात आला. येथील जुन्या मार्केट यार्डात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

Transporters strike in Pimpalgaon for fare hike | पिंपळगावी भाडेवाढीसाठी वाहतूकदारांचा संप सुरू

पिंपळगाव बसवंत येथील जुन्या मार्केट यार्डात झालेल्या बैठकीप्रसंगी उपस्थित ट्रक-टेम्पोचालक-मालक संघटनेचे पदाधिकारी.

googlenewsNext
ठळक मुद्देनिवेदन : मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार

लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपळगाव बसवंत : सहा वर्षांपासून मागणी करूनही भाडेवाढ केली नसल्याने पिंपळगाव बसवंत ट्रक-टेम्पो चालक-मालक संघटनेच्या वतीने मंगळवारपासून (दि. ८) संपाचे हत्यार पुकारले. जोपर्यंत मागणी पूर्ण होऊ शकत नाही, तोपर्यंत संप मागे घेणार नसल्याचा इशारा देण्यात आला. येथील जुन्या मार्केट यार्डात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
ट्रक - टेम्पोचालक-मालक संघटनेच्या वतीने कांदा व्यापारी असोसिएशनला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दर तीन वर्षांनी भाडेवाढ करण्याचे ठरले होते. डिझेलचा भाव ४५ रुपये असताना जे भाडे मिळत होते तेच भाडे आता दिले जात आहे. सध्या डिझेलचा दर ८० रुपयांवर गेला असतानाही पूर्वीचेच भाडे व्यापारी असोसिएशन देत आहे. यावेळी शांताराम खरात, जगदीश कोठाळे, बाळासाहेब घुमरे, फईम सय्यद, राजू सय्यद, कैलास रिकामे, सचिन गिते, दौलत विधाते, अण्णा सोनगिरे, अरुण खैरनार, वसंतराव निकम उपस्थित होते.संप काळात दररोज दोन लाखांचे नुकसानट्रक-टेम्पोचालक-मालक संघटनेच्या ११५ ट्रक आहे. दररोज एका वाहनामागे २००० हजार याप्रमाणे दोन लाखांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे संप काळात मोठा आर्थिक फटका बसणार आहे. यामुळे अनेक व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. भाडे वाढविण्याची मागणी होत आहे.गेल्या सहा वर्षांपासून भाडेवाढ करण्यात आलेली नाही. ४५ रुपये डिझेलचा दर असताना जे भाडे मिळत होते तेच भाडे आता दिले जात आहे. त्यामुळे आमचे नुकसान होत आहे. मागणीप्रमाणे कांदा व्यापारी असोसिएशनने पूर्तता न केल्याने मंगळवारपासून संप पुकारण्यात आला आहे.
- जगदीश कोठाळे, पदाधिकारी, ट्रक-टेम्पो चालक-मालक संघटना

Web Title: Transporters strike in Pimpalgaon for fare hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.