....चक्क सायकलवरून मद्य वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:13 AM2021-04-14T04:13:39+5:302021-04-14T04:13:39+5:30
नाशिक : गेल्या शनिवार, रविवारी शहरात कडक निर्बंधांची काटेकोर अंमलबजावणी पोलिसांकडून केली जात होती. या दरम्यान चक्क सायकलवरून दोघे ...
नाशिक : गेल्या शनिवार, रविवारी शहरात कडक निर्बंधांची काटेकोर अंमलबजावणी पोलिसांकडून केली जात होती. या दरम्यान चक्क सायकलवरून दोघे संशयित मद्य वाहतूक करताना पोलिसांच्या तावडीत ध्रुवनगर परिसरात सापडले.
राज्य शासनाच्या आदेशानुसार कोरोनाची साखळी खिळखिळी करण्यासाठी मद्यविक्री बंद ठेवण्यात आली आहे. मद्याच्या विक्रीवर निर्बंध असताना कोणाला संशय येऊ नये म्हणून सायकलवरून विनापरवाना मद्यवाहतुकीची शक्कल लढविणाऱ्या दोघा संशयितांना पोलिसांनी अटक केली.
संशयितांच्या ताब्यातून बेकायदा दारू साठ्यासह सायकल असा ऐवज हस्तगत करण्यात आला असून याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिव्यामोहन सुनील राज (२१, श्रमिकनगर), हेमंत उर्फ राहुल नितीन थोरात (२१, रा. धर्माजी कॉलनी, शिवाजीनगर) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
शनिवार, रविवारी वीकेंडला कडक निर्बंध लावण्यात आले होते. यावेळी पोलिसांकडून चोख गस्त व नाकाबंदी केली जात होती. सर्व दुकाने बंद असताना ध्रुवनगर येथील रस्त्यावरून सायकलवर विनापरवानगी मद्यवाहतूक करताना राज व थोरात आढळून आले. त्यांच्याकडून विदेशी दारूच्या ४८ बाटल्या आणि सायकल असा सुमारे ३ हजार ६२० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.