अडकलेले नागरिक गावाकडे रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 09:44 PM2020-05-11T21:44:50+5:302020-05-11T23:33:06+5:30

सिन्नर : गेल्या महिनाभरापासून वावी येथील क्वॉरण्टाइन सेंटरमध्ये अडकून पडलेल्या २१ उत्तर भारतीय नागरिकांना रविवारी (दि. १०) संध्याकाळी ५ वाजता त्यांच्या मूळगावाकडे रवाना करण्यात आले. गेल्या आठ दिवसांपासून त्यांच्या या प्रवासासाठी प्रशासकीय परवानग्यांचा खेळ आटोपल्यावर हे सर्वजण खासगी वाहनातून मार्गस्थ झाले.

 Trapped citizens rushed to the village | अडकलेले नागरिक गावाकडे रवाना

अडकलेले नागरिक गावाकडे रवाना

Next

सिन्नर : गेल्या महिनाभरापासून वावी येथील क्वॉरण्टाइन सेंटरमध्ये अडकून पडलेल्या २१ उत्तर भारतीय नागरिकांना रविवारी (दि. १०) संध्याकाळी ५ वाजता त्यांच्या मूळगावाकडे रवाना करण्यात आले. गेल्या आठ दिवसांपासून त्यांच्या या प्रवासासाठी प्रशासकीय परवानग्यांचा खेळ आटोपल्यावर हे सर्वजण खासगी वाहनातून मार्गस्थ झाले.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या संचारबंदी आदेशाचा भंग करणारे उत्तर प्रदेशातील २१ जण पोलिसात गुन्हे दाखल झाल्यानंतर वावी येथील क्वॉरण्टाइन सेंटरमध्ये स्थानबद्ध होते. गेल्या एक महिन्यापासून या नागरिकांच्या जेवणाची व राहण्याची व्यवस्था पंचायत समितीमार्फत सुरू करण्यात आलेल्या क्वॉरण्टाइन सेंटरमध्ये करण्यात आली होती. वावी येथील आर.पी. गोडगे पाटील पब्लिक स्कूलच्या वसतिगृहात साकारण्यात आलेल्या या सेंटरमध्ये ५२ परप्रांतीय दाखल होते.

त्यापैकी मध्यप्रदेशातील नागरिक चार दिवसांपूर्वीच विशेष रेल्वेने रवाना झाले होते. तर उत्तर प्रदेशातील अनुक्रमे १० व ११ जणांचा गट महिन्याभरापासून येथेच अडकून पडला होता. यातील १0 जणांच्या गटाने खासगी वाहनाने जाण्यासाठी स्वतंत्र परवानगी प्रशासनाकडे मागितली होती. मात्र, त्या दरम्यान त्यांचे रेल्वेचे पास तयार झाल्याने खासगी वाहनाला परवानगी देण्यात प्रशासन असमर्थ ठरले होते. मात्र, याही परिस्थितीत तहसीलदार राहुल कोताडे, नायब तहसीलदार दत्ता जाधव, गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड, सेंटरचे समन्वयक तालुका पशुधन अधिकारी डॉ. मिलिंद भणगे यांनी प्रयत्न करत या दहा जणांना उत्तर प्रदेशात जाण्यासाठी विशेष वाहनाची परवानगी मिळवून दिली. ही परवानगी देतानाच सेंटरमध्ये अडकून पडलेल्या अन्य ११ उत्तर भारतीय नागरिकांना देखील त्याच वाहनातून नेण्याची विनंती त्यांनी संबंधितांना केली होती.
आपल्यासोबत गेला महिनाभर अडकून पडलेल्या या ११ मजुरांकडे पैसे नसल्याने त्यांना सोबत नेण्यासाठी अलाहाबाद येथील गट तयार झाल्यावर प्रशासनाने यांनादेखील रवाना केले आहे. हे अकरा मजूर अलाहाबाद पासून सुमारे अडीचशे किलोमीटर पुढे जाणार आहेत. अलाहाबाद पर्यंत या मजुरांची वाहनाची सोय झाल्याने प्रशासकीय यंत्रणेने देखील सुटकेचा निश्वास सोडला.

Web Title:  Trapped citizens rushed to the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक