रस्ता दुभाजकांमध्ये कचऱ्याचे ढीग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 01:35 AM2019-09-20T01:35:09+5:302019-09-20T01:35:26+5:30
गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाचे पुन्हा आगमन झाले असून, मात्र पावसामुळे पुन्हा ठिकठिकाणी चिखल होत आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून, त्यात पाणी डबके साचल्याने डासांचा प्रादुर्भाव होत आहे. तसेच रस्ता दुभाजकांमध्ये कचरा व घाणीमुळे दुर्गंधी निर्माण झाली आहे.
नाशिक : गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाचे पुन्हा आगमन झाले असून, मात्र पावसामुळे पुन्हा ठिकठिकाणी चिखल होत आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून, त्यात पाणी डबके साचल्याने डासांचा प्रादुर्भाव होत आहे. तसेच रस्ता दुभाजकांमध्ये कचरा व घाणीमुळे दुर्गंधी निर्माण झाली आहे.
पावसामुळे चिखलातून रस्ता तुडवत नागरिकांना वाट काढावी लागत आहे. यामध्ये मोठे हाल हे नोकदारांचे झाल्याचे दिसून येतात. यामुळे त्यांना कामावर जाताना मोठ्या संकटाचा सामना करावा लागतो. त्यात पावसामुळे शहरातील विविध भागांत पावसामुळे पाण्याचे डबके साचतात. त्यात अशा डबक्यांमधील पाणी बरेच दिवस तेथे साचून राहत असल्यामुळे यामध्ये डेंग्यूच्या अळ्या अशा डबक्यांमध्ये तयार होऊ शकतात. आपल्या घराजवळील असेलेल्या निकामी टायर्स, भंगार वस्तू, नारळाच्या करवंट्या, फुलदाण्या, फ्रिज आदी वस्तूंमध्ये पाणी साचून राहत असल्यामुळे या ठिकाणी डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती वाढत असते. याबाबत वारंवार महापालिकेकडून सावध केले जात असले तरी याकडे नागरिकांकडून दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे अशा ठिकाणी आजारांना आयते आमंत्रण मिळत आहे.