अपघातप्रवण क्षेत्रात ट्रॉमा केअर सेंटर उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2020 11:46 PM2020-01-30T23:46:30+5:302020-01-31T00:44:57+5:30

नागरिकांना चांगल्या आरोग्याच्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न असून, अपघात प्रवण क्षेत्रात ट्रॉमा केअर सेंटर उभारण्यास शासनाचे प्राधान्य राहील. यामुळे रु ग्णांचे प्राण वाचण्यास मदत होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

Trauma care center to be set up in accident area | अपघातप्रवण क्षेत्रात ट्रॉमा केअर सेंटर उभारणार

नाशिक येथे आयोजित विभागीय विकास आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. समवेत कृषिमंत्री दादा भुसे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, मुख्य सचिव अजेय मेहता.

googlenewsNext
ठळक मुद्देउद्धव ठाकरे : नाशिकमध्ये विभागीय आढावा बैठक

नाशिक : नागरिकांना चांगल्या आरोग्याच्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न असून, अपघात प्रवण क्षेत्रात ट्रॉमा केअर सेंटर उभारण्यास शासनाचे प्राधान्य राहील. यामुळे रु ग्णांचे प्राण वाचण्यास मदत होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
नाशिकमध्ये विभागीय आढावा बैठकीअंतर्गत गुरुवारी (दि.३०) जिल्हाधिकारी कार्यालयात नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि अहमदनगर या पाच जिल्ह्यांच्या विकासकामांची आढावा बैठक पार पडली. धुळे जिल्ह्याच्या बैठकप्रसंगी ते बोलत होते. बैठकीस कृषिमंत्री दादा भुसे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, आमदार श्रीमती मंजुळा गावित, आमदार काशीराम पावरा, आमदार डॉ. फारु क शहा, मुख्य सचिव अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे प्रधानसचिव भूषण गगराणी, कृषी सचिव एकनाथ डवले, जलसंपदा सचिव आय. एस. चहल, ऊर्जा सचिव असिमकुमार गुप्ता, विभागीय आयुक्त राजाराम माने, धुळ्याचे जिल्हाधिकारी गंगाथरण डी., मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मती सी. महापालिका आयुक्त शेख आदिंसह सर्व विभागांचे जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित होते.
राज्यातील अनुसूचित क्षेत्रातील १२०० गावांचा पेसामध्ये समावेश करण्यासाठी राज्य शासनाने प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव आठ दिवसांत केंद्र शासनास सादर करण्यात येईल. साक्री येथील मोडकळीस आलेल्या बसस्थानकाच्या दुरु स्तीचे काम लवकरात लवकर सुरू करण्यासाठी संबंधितांना निर्देश देण्यात येतील. जलयुक्त शिवार अभियानाची जी कामे प्रगतिपथावर आहे तसेच जी कामे सुरू झाली आहे ती पूर्ण करण्यात येतील. धुळे शहरातील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी मालेगाव रोडवर उड्डाणपुलाचा प्रस्ताव तातडीने तयार करण्याची सूचनाही त्यांनी केली. निम्न पांझरा, अक्कलपाडा धरण पूर्ण भरण्यासाठी आवश्यक असलेली भूसंपादनाची अडचण लक्षात घेता हे धरण भरल्यानंतर त्याखालील धरण भरून जलसाठा वाढविण्यात येईल, असेही ते म्हणाले.
यावेळी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी जिल्ह्यातील बेरोजगारीचा प्रश्न सुटण्यासाठी जिल्ह्यातील नरडाणा औद्योगिक वसाहतीत उद्योग येण्यासाठी राज्य शासनाने मदत करावी. तसेच धुळे शहरात १०० खाटांचे रुग्णालय मंजूर असून, त्यासाठी लागणारा कर्मचारीवर्ग तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी केली. त्याचबरोबर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे एमआरआय मशीन खरेदीस तसेच रिक्त पदे भरण्याची मागणी यावेळी केली.

आरोग्य केंद्राचा प्रश्न सोडविण्याचे निर्देश
शेतकऱ्यांचा पीकविम्याचा प्रश्न सोडविण्यासाठी नवीन कंपन्यांशी चर्चा सुरू असून, हा प्रश्न तातडीने सोडविण्यास प्राधान्य देण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. त्याचबरोबर जिल्हाधिकाºयांनी याबाबत बैठक घेऊन योग्य मार्ग काढण्याचे व शिरपूर हे महामार्गावरील महत्त्वाचे शहर असल्याने येथील आरोग्य केंद्राचा प्रश्न सोडविण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिलेत.

Web Title: Trauma care center to be set up in accident area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.