स्वाभिमानीतर्फे ठिय्या आंदोलन
By admin | Published: December 16, 2015 10:59 PM2015-12-16T22:59:13+5:302015-12-16T23:01:09+5:30
सटाणा : पाण्याच्या आवर्तनासाठी पुन्हा तारीख पे तारीख
सटाणा : बागलाण तालुक्यातील हरणबारी व केळझर या मध्यम प्रकल्पांच्या पाणी साठ्याचे जिल्हा प्रशासनाकडून गेल्या आठवडयात नियोजन करण्यात आले.त्यानुसार १४ डिसेंबर रोजी हरणबारी धरणातून पिण्यासाठी पाण्याचे पहिले आवर्तन सोडण्याचे जाहीर केले होते.मात्र याबाबत जिल्हा प्रशासनाने घुमजाव करत पुन्हा तारीख पे तारीख चे गुऱ्हाळ चालू केले आहे.त्यामुळे संतप्त स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्यांनी बुधवारी दुपारी बारा वाजेपासून तहसीलदारांच्या दालनात तब्बल साडे तास ठिय्या देऊन पाणी सोडण्याची मागणी केली.निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी १७ डिसेंबरला पाणी सोडण्याबाबत आदेश काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर ठिय्या मागे घेण्यात आला.
जिल्हा प्रशानाने पाण्याचे आवर्तन सोडण्याबाबत पुन्हा चालढकल सुरु केली. यामुळे संतप्त झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्यांनी बुधवारी अचानक संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख दीपक पागर यांच्या नेतृत्वाखाली येथील तहसिदारांच्या दालनात दुपारी बारा वाजेपासून हरणबारी धरणातून तत्काळ पाणी सोडावे या मागणीसाठी ठिय्या आंदोलन सुरु केले. तहसीलदार अश्विनीकुमार पोतदार हे नाशिक येथे बोलावलेल्या बैठकीला गेल्याने जबाबदार अधिकारी आल्याशिवाय ठिय्या मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका यावेळी आंदोलनकर्त्यांनी घेतल्याने महसूल कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली. दरम्यान साडे तीन वाजेच्या सुमारास निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख दीपक पगार यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून मोसम नदी पात्रालगतच्या गावातील पाणी टंचाई लक्षात घेता हरणबारी धरणातून पिण्याच्या पाण्याचे पिहले आवर्तन सोडण्याबत गुरु वार दि.१७ सायंकाळी पाच वाजता आदेश काढण्याबाबत आश्वासन दिले .त्यानंतर साडे तीन तासांनंतर ठिय्या आंदोलन मागे घेतले. आंदोलनात पागर यांच्यासह प्रदेश सचिव संजय वाघ शिरसमनीकर ,डोंगर पागर,पंढरीनाथ अिहरे,शरद अहिरे,सचिन अहिरे, मधुकर अहिरे, सुदाम देवरे, युवराज शिंदे,योगेश अहिरे, दादाजी अहिरे, शेखर कापडणीस, दादाजी पगार,राजेंद्र कापडणीस,अरु ण कापडणीस,भास्कर पगार,भिला धोंडगे,बाजीराव धोंडगे, कडू धोंडगे आदी सहभागी झाले होते.
बुधवारी कांद्याचे भाव पुन्हा प्रती क्विंटल दोनशे ते तीनशे रु पयांनी कोसळले आहे. शासनाने तत्काळ कांद्यावरील निर्यात मूल्य कायमस्वरूपी शून्य करावे ,जेणे करून दुष्काळाने होरपळत असलेल्या शेतकऱ्याला दिलासा मिळेल. सरकारने निर्णय न घेतल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरेल असा इशाराही यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला .