बंद पडणाऱ्या शाळेचा आयएसओ शाळेकडे प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2019 06:46 PM2019-03-06T18:46:49+5:302019-03-06T18:47:21+5:30
खडक माळेगाव : जिल्हा परिषद सेमी इंग्रजी रायतेवस्ती शाळेला नुकतेच गुणवत्ता नियंत्रण विभागाकडून आएसओ ९००१; २०१५ नामांकन प्राप्त झाले असून शाळेने गेल्या २ वर्षापासून लोकसहभाग व ग्रामपंचायतच्या सहकार्याने गुणवत्ता विषयक सर्व निकष पूर्ण करण्यासाठी केलेल्या नियोजनबध्द प्रयत्नाचे फलित आहे.
खडक माळेगाव : जिल्हा परिषद सेमी इंग्रजी रायतेवस्ती शाळेला नुकतेच गुणवत्ता नियंत्रण विभागाकडून आएसओ ९००१; २०१५ नामांकन प्राप्त झाले असून शाळेने गेल्या २ वर्षापासून लोकसहभाग व ग्रामपंचायतच्या सहकार्याने गुणवत्ता विषयक सर्व निकष पूर्ण करण्यासाठी केलेल्या नियोजनबध्द प्रयत्नाचे फलित आहे.
३ वर्षापूर्वी शाळेचा पट संख्या अवघी ९ झाली असताना पटसंख्ये अभावी शाळा बंद पडते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती, पण शाळा परिसरातील शिक्षणप्रेमी नागरिक, पालक, ग्रामपंचायत व शिक्षक यांच्या संयुक्त प्रयत्नांनी शाळेने फिनिक्स भरारी घेऊन शाळेचे रूपडे पालटले असून आज शाळेत ३५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, आणि नव्या शैक्षणिक वर्षात पटसंख्या ५० होण्याची खात्री मुख्याध्यापक गोरख देवढे यांनी व्यक्त केली.
अवघ्या ३००० रूपये लोकसहभागापासून शाळेत सुधारणाची सुरूवात झाली असतांना २ वर्षात व्हॉट्सअप, फेसबुक या समाज माध्यमांच्या माध्यमातून तसेच प्रत्यक्ष भेटी याद्वारे रोख व वस्तू स्वरूपात जवळजवळ ३ लक्ष रूपयांचा लोकसहभाग जमविला असून लोकसहभागातून डिजीटल रंगकाम, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी ५ सी सी टीव्ही कमेऱ्यांचे सुरक्षा कवच, बहुपयोगी साऊंड सिस्टीम, वॉटर फिल्टर, वृक्ष संरक्षक जाळ्या, शाळा प्रवेशद्वार, संगणक, फर्निचर, स्टेज, मैदान सपाटीकरण, शोभिवंत झाडे, शाळा परिसरातील शंभर झाडांना ठिबक सिंचन, हँडवॉश स्टेशन, स्पोर्ट ड्रेस, बुट यासह वेगवेगळ्या सोयी, सुविधा उपलब्ध केल्या असून ‘माझा वाढदिवस’ जिल्हा परिषद शाळेत, भिंत दत्तक योजना, एक हात शाळेसाठी यासारख्या विविध उपक्र मांच्या माध्यमातून लोकसहभाग मिळविण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अॅन्ड्रॉइड टीव्ही, वाय-फाय सुविधा आदी सुविधा उपलब्ध झाल्या आहेत.
लोकसहभागाबरोबरच शाळा आपल्या वैविध्यपूर्ण उपक्र मांमुळे उपक्र मशील शाळा म्हणून नावारूपास आली असून शाळेत डिजीटल रचनावाद, लेट्स स्पिक उपक्र म, दप्तरमुक्त शनिवार, स्वच्छता दूत, सांस्कृतिक स्नेहसंमेलन, वृक्ष संगोपन स्पर्धा, वाचन संस्कृती जपण्यासाठी लोकवाचनालय, काऊ-चिऊ चा खाऊ, पक्षी पाणवठा यासारखे विविध उपक्र म राबविले जातात.
शाळेत राबविले जाणारे उपक्र म व शाळेत घडत असलेले सकारात्मक बदल बघून अनेक शिक्षणप्रेमी तरूण, प्रतिष्ठित नागरिक शाळेत स्वयंप्रेरणेने श्रमदान करतात. शाळेला नुकतेच वल्ली२ूङ्म २ूँङ्मङ्म’ ू’४ुचे सदस्यत्व प्राप्त झाले असून असून शासनाच्या शाळासिध्दी मूल्यमापनातही शाळेने ‘अ’ श्रेणी प्राप्त केली आहे.