नाशिककरांचा प्रवास होणार सुखकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2018 04:32 PM2018-02-02T16:32:53+5:302018-02-02T16:32:59+5:30
‘पंचवटी एक्सप्रेस’ च्या संपूर्ण २१ नवीन बोगी ची बांधणी पूर्णत्वाकडे
नाशिक -पंचवटी एक्सप्रेसच्या संपुर्ण २१ नवीन बोगीची बांधणी पुर्णत्वाकडे आल्याने दररोज प्रवास करणाºया हजारो प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार आहे. मनमाड ते मुंबई प्रवास करणारे नोकरदार, व्यावसायिक, विद्यार्थी, रु ग्ण, पर्यटक यांच्यासाठी पंचवटी एक्स्प्रेस ही रेल्वे अतिशय सोयीची आहे. ही गाडी, रेल्वेला भरघोस महसूल देते. रेल परिषदेने आदर्श कोचच्या माध्यमातून पंचवटी एक्सप्रेसला ५ वेळा ‘लिम्का बुकआॅफ रेकोर्ड ’ मध्ये स्थान मिळवून दिले आहे. रेल परिषद, पंचवटी एक्स्प्रेस ला ‘आदर्श’ ट्रेन बनवण्या करिता प्रयत्नशील आहे. प्रवाशांना चांगली सोय मिळावी, सुकर प्रवास व्हावा याकरिता रेल प्रशासनाशी विविध मागण्यांचा सतत पाठपुरावा केला जात आहे. याच अनुषंगाने रेल परिषद ने नवीन रेक ( संपूर्ण २१नवीनबोगी ) मिळावी. अशी मागणी रेल्वेमंत्री तसेच जनरल मॅनेजर यांच्याकडे केली होती. जनरल मॅनेजर यांनी त्याबाबत रेल्वे बोर्डाकडे पाठपुरावा केला होते. चेन्नई येथे याचे काम पुर्णत्वाकडे आले आहे. साधारण एक महिन्यात हे नवे कोच नाशिकच्या प्रवाशांना मिळण्याची शक्यता आहे. रेल परिषदेचे अध्यक्ष बिपीन गांधी व गुरमितसिंग रावल यांनी चेन्नई येथे जावून ‘पंचवटी एक्स्प्रेस’ च्या नवीन रेकच्या बांधणीची समक्ष पाहणी केली. यावेळीअभियंताएल. सी. त्रिवेदी यांनी कोच ची बांधणी दाखविली. या कोचमध्ये अनेक नवनवीन सुविधा केल्या असून प्रवाशांना सुखकर, आनंददायी प्रवासाचा अनुभव घेता येणार आहे.