पोर्तुगाल ते भारत सायकलवरून प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 12:11 AM2018-04-29T00:11:45+5:302018-04-29T00:11:45+5:30

पोर्तुगाल ते भारत असा २५ हजार किलोमीटरचा सायकलवरून प्रवास करत देवळाली कॅम्पला दाखल झालेला सायकलस्वार योगेश गुप्ता याचे स्वागत करून सत्कार करण्यात आले.

Travel from Portugal to India bicycle | पोर्तुगाल ते भारत सायकलवरून प्रवास

पोर्तुगाल ते भारत सायकलवरून प्रवास

Next

देवळाली कॅम्प : पोर्तुगाल ते भारत असा २५ हजार किलोमीटरचा सायकलवरून प्रवास करत देवळाली कॅम्पला दाखल झालेला सायकलस्वार योगेश गुप्ता याचे स्वागत करून सत्कार करण्यात आले.  देवळाली कॅम्प येथील रहिवासी योगेश गुप्ता हा पेट्रोकेमिकल इंजिनिअर झाल्यानंतर अमेरिकेत नोकरी करीत होता. नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर योगेश गुप्ता याने सायकलवरून मायदेशी जाण्याचा निर्णय घेतला. घरी येण्याची ओढ लागलेली असतानादेखील योगेश याने सायकलवरूनच गेल्या २ महिन्यांपासून नागालँड, आसाम, मेघालय, पश्चिम बंगाल, झारखंड, ओरिसा, छत्तीसगड या राज्यांतून मार्गक्रमण करत नागपूरमार्गे महाराष्ट्र प्रवेश करून देवळालीत आगमन झाले. यावेळी अण्णाज् टेम्पल ग्रुपच्या वतीने योगेश याचा महाराज बिरमानी, नगरसेवक सचिन ठाकरे, नागेश देवाडिगा, दीपक बलकवडे, भगवान शिंदे, दिगंबर जाधव, कौशल्या मुळाणे, शांतीलाल भुतडा, निर्मला बागुल, हरिष गुप्ता आदींच्या हस्ते स्वागत करून सत्कार करण्यात आला.  २० महिन्यांपूर्वी पोर्तुगालपासून सायकलवरून मायदेशी येण्यासाठी योगेश याने प्रवास करत स्पेन, फ्रान्स, इटली, स्लोवेनिया, क्रोयिशिया, अल्बेनिया, मोटेगा, सर्बिया, बल्गेरिया, जॉर्जिया, इराण, कजाकिस्तान, मंगोलिया, लायोस, कम्बोडिया, थायलंड, म्यानमार आदी ३२ देशांतून मार्गक्रमण करत भारतात प्रवेश केला.

Web Title: Travel from Portugal to India bicycle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक