पुणे ते दिल्ली पायी प्रवास
By admin | Published: March 4, 2017 12:39 AM2017-03-04T00:39:18+5:302017-03-04T00:39:30+5:30
येवला : अॅट्रॉसिटी कायद्यात दुरुस्ती करण्यात यावी यासाठी फुरसुंगी (पुणे) येथून पायी उलट जाऊन दिल्लीला पंतप्रधानांना निवेदन देणार असल्याचे श्रीपतराव दगडोपंत गुंड यांनी सांगितले.
येवला : मराठा आरक्षणासह महिला अत्याचार थांबावेत, अॅट्रॉसिटी कायद्यात दुरुस्ती करण्यात यावी यासह २१ मागण्यांसाठी शासनाने गांभीर्याने घ्यावे यासाठी फुरसुंगी (पुणे) येथून पायी उलट जाऊन दिल्लीला एक दिवसाचे उपोषण करून राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना निवेदन देणार असल्याचे बापूराव ऊर्फ श्रीपतराव दगडोपंत गुंड यांनी सांगितले.
गुंड हे येवल्यात पोहोचल्यानंतर येथील हुडको परिसरात नगरसेवक सचिन शिंदे आणि त्यांच्या मित्र परिवाराने त्यांचा सत्कार केला. यावेळी श्रीपतरावांनी युवकांशी संवादही साधला. यावेळी सुबोध शिंदे, रवि शिंदे, प्रमोद दाणे, श्याम शिंदे, संजय जाधव, प्रमोद लहरे, राम शिंदे, उदय कुलकर्णी, पंकज माळी, अण्णा गायकवाड, रवींद्र तुपकरी, संजय शिंदे, यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
हातात त्रिशूळासह भगवा झेंडा, डोक्यावर छत्रपतींचा फोटो, अंगावर मराठा आरक्षणासह २१ मागण्या लिहिलेला सदरा घातलेले गुंड पायी प्रवास करीत दिल्लीकडे निघाले आहेत. दरम्यान विश्रांती म्हणून गुरुवारी रात्री येवल्यात पायी प्रवासात मुक्कामी होते. बापूरावांशी बोलताना अनेक बाबींवर प्रकाश पडला. पुणे - मुंबई उलटे पायी चालत २१ डिसेंबरला २०१६ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना २१ मागण्यांचे निवेदन दिले. परंतु शासनाला काहीही फरक पडला नाही. शासनाच्या दुर्लक्षामुळे ६ ते १७ जानेवारीदरम्यान पुणे ते पंढरपूर-तुळजापूर पायी उलट चालत जाऊन आई तुळजाभवानी आणि पांडुरंगाला साकडे घालत मागण्या पूर्तीसाठी थेट सरकारलाच आव्हान दिले.