मुंबई ते इलाहाबाद प्रवास करणाऱ्यांना पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 08:23 PM2020-04-11T20:23:35+5:302020-04-12T00:19:50+5:30

सिन्नर : मुंबई येथून इलाहाबाद (उत्तर प्रदेश) येथे दोन कारमधून निघालेल्या दहा जणांविरोधात सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 Travelers caught in Mumbai to Allahabad | मुंबई ते इलाहाबाद प्रवास करणाऱ्यांना पकडले

मुंबई ते इलाहाबाद प्रवास करणाऱ्यांना पकडले

Next

सिन्नर : मुंबई येथून इलाहाबाद (उत्तर प्रदेश) येथे दोन कारमधून निघालेल्या दहा जणांविरोधात सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोनाची साथ असताना जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
मुंबई येथून इलाहाबाद कडे बीट कार व हुंडाई सेंट्रो कार या दोन कार मध्ये दहा जण मुंबईकडून इलाहाबाद कडे जात असल्याची माहिती सिन्नर पोलिसांना मिळाली होती. पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक
विजय माळी, हवालदार उदय पाठक, नितीन कटारे, नवनाथ शिरोळे, श्रीकांत गारूनगे यांनी सिन्नर घोटी महामार्गावर शिवारात सापळा रचला. दुपारी दीड वाजेच्या सुमारास घोटी कडून दोन्ही वाहने आल्यानंतर बेलू फाट्याजवळ या दहा जणांना ताब्यात घेण्यात आले.
तहसीलदारांमार्फत नगरपालिकेच्या रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी देण्यात आले. कोरोनाची साथ असताना तोंडाला मस्त न लावता फिरताना आढळून येणे आणि जिल्हाधिका-यांच्या जिल्हा उल्लंघन आदेशाची पायमल्ली केल्याप्रकरणी या दहा संशयितांनी विरोधात सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Web Title:  Travelers caught in Mumbai to Allahabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.