प्रवासी युवकाला रिक्षाचालकांसह त्याच्या साथीदारांनी लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2020 03:26 PM2020-01-05T15:26:01+5:302020-01-05T15:28:36+5:30

मुलांना दुसऱ्या खोलीत कोंडून ठेवत त्यांना जिवे ठार मारण्याची धमकी देत लैंगिक अत्याचार केले. राहत्या घरात तसेच राणेनगर परिसरात पीडितेला नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध शरीरसंबंध ठेवून बलात्कार केला.

The traveling youth was robbed by his companion along with a rickshaw driver | प्रवासी युवकाला रिक्षाचालकांसह त्याच्या साथीदारांनी लुटले

प्रवासी युवकाला रिक्षाचालकांसह त्याच्या साथीदारांनी लुटले

Next
ठळक मुद्देआरडाओरड करू नको, नाही तर जिवे ठार मारू’ असा दम दुधविक्रेत्याकडून महिलेवर बलात्कार

नाशिक : प्रवासी युवकाला रिक्षाचालक व त्याच्या तिघा साथीदारांनी रात्रीच्या सुमारास कलानगर-वडाळागावादरम्यान शंभरफुटी रस्त्यावर शस्त्राचा धाक दाखवून जबर मारहाण करत लुटल्याची घटना गुरुवारी (दि.२) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, साईनाथनगर येथून गुरुवारी (दि.२) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास फिर्यादी अमोल सुरेश पाटील (२९, रा. चामुंडा क्लासिक) हा युवक रिक्षामध्ये घरी जाण्यासाठी बसला. रिक्षामध्ये रिक्षाचालकासह तिघे इसम पाठीमागे बसलेले होते. यावेळी या तिघांसह रिक्षाचालकाने अमोलच्या पाठीला धारधार शस्त्र लावून आरडाओरड करू नको, नाही तर जिवे ठार मारू’ असा दम भरत रिक्षा कलानगर चौफुलीवरून वडाळागावाच्या दिशेने नाल्यापर्यंत नेली. तेथे त्यास मारहाण करत त्याच्याकडील दहा हजार रुपये किमतीचा स्मार्ट मोबाइल, ९ हजार ५०० रुपयांची रोख रक्कम हिसकावून घेत त्याला रिक्षातून ढकलून देत लाथाबुक्क्यांनी मारहाण करून संशयित इसमांनी रिक्षातून पळ काढला. याप्रकरणी अमोल याच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा संशयित फरार रिक्षाचालक व त्याच्या साथीदारांविरुद्ध दाखल केला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक बाकले हे करीत आहेत. मागील काही दिवसांपासून इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीत लूटमारीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, परिसरात पोलिसांची गस्त प्रभावी ठरत नसल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात आहे.

दुधविक्रेत्याकडून महिलेवर बलात्कार
चेतनानगर भागातील रहिवासी असलेल्या पीडित महिलेच्या घरात कच्चे दूध देण्याच्या बहाण्याने येत पीडित महिलेचे पतीसोबतच्या खासगी क्षणांचे छायाचित्र व चित्रफिती स्वत:च्या मोबाइलमध्ये घेत वारंवार धमकावून संशयित आरोपी दिलीप जाधव (वय ४०,रा. रायगडनगर) याने पीडितेसोबत १ जून ते ३१ डिसेंबरच्या कालावधीत बळजबरीने संभोग करत बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित जाधव हा कच्चे दूध देण्याचा बहाणा करून पीडितेच्या राहत्या घरी आला. पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार जाधव याने घरात प्रवेश करत ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत पीडितेला वारंवार धमकावून तिच्या मुलांना दुसऱ्या खोलीत कोंडून ठेवत त्यांना जिवे ठार मारण्याची धमकी देत लैंगिक अत्याचार केले. राहत्या घरात तसेच राणेनगर परिसरात पीडितेला नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध शरीरसंबंध ठेवून बलात्कार के ला. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी पीडितेच्या फिर्यादीवरून संशयित जाधवविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पुढील तपास महिला उपनिरीक्षक बरेला करीत आहेत.

Web Title: The traveling youth was robbed by his companion along with a rickshaw driver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.