फिरत्या दवाखान्यांमार्फत २ हजार ७४३ रुग्णांवर उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2020 09:55 PM2020-05-04T21:55:12+5:302020-05-04T22:57:13+5:30

नाशिक : कोरोना महामारीमुळे वैद्यकीय यंत्रणा व डॉक्टर, नर्स यांसह आरोग्य कर्मचाऱ्यांवरील निर्माण झालेला ताण कमी करण्यासाठी नाशिकमध्ये भारतीय जैन संघटनेने तीन वाहनांच्या माध्यमातून फिरत्या दवाखान्यांची सुविधा उपलब्ध करून दिली असून, या फिरत्या दवाखान्यांच्या माध्यमातून आतापर्यंत जवळपास २ हजार ७४३ रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत.

 Treatment of 2 thousand 743 patients through mobile clinics | फिरत्या दवाखान्यांमार्फत २ हजार ७४३ रुग्णांवर उपचार

फिरत्या दवाखान्यांमार्फत २ हजार ७४३ रुग्णांवर उपचार

Next

नाशिक : कोरोना महामारीमुळे वैद्यकीय यंत्रणा व डॉक्टर, नर्स यांसह आरोग्य कर्मचाऱ्यांवरील निर्माण झालेला ताण कमी करण्यासाठी नाशिकमध्ये भारतीय जैन संघटनेने तीन वाहनांच्या माध्यमातून फिरत्या दवाखान्यांची सुविधा उपलब्ध करून दिली असून, या फिरत्या दवाखान्यांच्या माध्यमातून आतापर्यंत जवळपास २ हजार ७४३ रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. भारतीय जैन संघटनेच्या ‘डॉक्टर आपल्या दारी’ या उपक्रमामुळे नाशिक परिसरातील आरोग्य सुविधांवर येणारा ताण कमी होण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत होत आहे.
महाराष्ट्रात आतापर्यंत हजाराहून अधिक कोविड-१९ कोरोनाची प्रकरणे समोर आली असून, सर्वाधिक संसर्गग्रस्त म्हणून राज्य अग्रक्रमावर आहे. दरदिवशी पॉझिटिव्ह रुग्ण आढळत असल्याने सध्या राज्यातील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात ताण निर्माण होत असताना या समस्येच्या निराकरणासाठी नाशिकमध्ये भारतीय जैन संघटनेने महाराष्ट्रात ‘डॉक्टर आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत फिरत्या दवाखान्याची सुविधा उपलब्ध करून दिली असून, तीन वाहनांमधून डॉक्टर, मदतनीस, औषधांनी सुसज्ज फिरत्या दवाखान्यांची सोय करून दिली आहे. पूर्व-सूचित वेळापत्रकानुसार हे फिरते दवाखाने नाशिक परिसरातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत भागांत रुग्णांना मोफत वैद्यकीय सेवा देत असून आत्तापर्यंत २ हजार ७४३ रुग्णांवर या फिरत्या दवाखान्याच्या माध्यमातून उपचार करण्यात आले आहे. या व्हॅनमध्ये डॉक्टर आणि वैद्यकीय मदतनीसांची संपूर्ण टीम सुसज्जित असून, कोविड-१९ ची लक्षणे रुग्णांमध्ये तपासण्यात येतात. ज्या रुग्णांमध्ये थेट संसर्ग आढळून येतो, त्यांना नियुक्त करण्यात आलेल्या रुग्णालयात पाठवले जाते. डॉक्टरांनी लिहून दिलेली किंवा उपलब्ध करून देण्यात येणारी सर्व औषधे मोफत पुरवली जात आहेत.
-----
भारतीय जैन संघटनेचा उपक्रम
दरदिवशी मोबाइल युनिट्समध्ये अडीच हजार लोकांची तपासणी करण्यात येते आणि दिवसाला जवळपास पाचशे रुग्णांमध्ये लक्षणांची चाचपणी केली जाते. व्हॅनमधील डॉक्टर रुग्णांची ताप, सर्दी, खोकल्याची तपासणी करतात आणि त्यांना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करण्याविषयी सांगतात. याप्रमाणे मागील २० दिवसांत २ हजार ७४३ हून अधिक रहिवाशांची तपासणी करण्यात आली असून, ९ हून जास्त कोविड-१९ संशयित रुग्णांना सरकारी रुग्णालयांत पाठविण्यात आले आहे. कोरोना विषाणूचे समूळ उच्चाटन होईपर्यंत ही सेवा सुरू राहणार असल्याची माहिती भारतीय जैन संघटनेने दिली आहे.

Web Title:  Treatment of 2 thousand 743 patients through mobile clinics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक