रुग्णांच्या थेट घरी जाऊन कोरोनावर उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:13 AM2021-05-01T04:13:41+5:302021-05-01T04:13:41+5:30
चांदोरी येथे खासगी दवाखान्यात डॉ. दीक्षित हे दिवसभरात किमान ५०हून अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करत आहेत. स्कोअर ...
चांदोरी येथे खासगी दवाखान्यात डॉ. दीक्षित हे दिवसभरात किमान ५०हून अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करत आहेत. स्कोअर कमी असलेल्या पेशंटला घरीच टेलिमेडिसीन देऊन उपचार करण्यासाठी पाठवून देतात, मात्र घरी गेल्यानंतर होमक्वारंटाइन व्हावे, किमान वीस दिवस कोणाच्या संपर्कात येऊ नये, असा नियम ते घालून देतात, प्रसंगी जेव्हा गरज असेल तेव्हा थेट घरी जाऊन रुग्णांना सेवा देत आहेत.
उपचार करत असताना रुग्णांमध्ये आत्मविश्वास वाढवण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधतात. एकदा कोरोना रोगाची भीती मनातून गेली की पेशंट अर्धे बरे होते, चांगला आहार, जास्त फळे खाणे, जास्त पाणी पिणे, मोबाइलपासून दूर रहाणे, वेळेवर दिलेली औषध घेणे असा सल्ला देऊन रुग्णांना ते सकारात्मक ऊर्जा देतात. एकीकडे मोठ्या मोठ्या नामांकित हॉस्पिटलमध्ये अव्वाच्या सव्वा बिले लावून लूट होत असताना डॉ. दीक्षित यांच्याकडून अल्पदरात उपचार केले जात असल्याने ते परिसरातील कोरोना रुग्णांसाठी आरोग्यदूत ठरले आहेत.
कोट....
कोरोनाची दुसरी लाट ही ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात फैलावत आहे. आज एकेका गावात सुप्त पॉझिटिव्ह रुग्णसंख्या भरपूर आहे. अशा काळात आरोग्य यंत्रणा हतबल झाली आहे. यंत्रणेवरही ताण आहे. अशावेळी स्कोर कमी असलेल्या रुग्णांना टेलिमेडिसिन देऊन घरीच उपचार करत आहे. वेळेत उपचार आणि न घाबरणारे रुग्ण थोड्या दिवसांत ठणठणीत बरे होतात.
- डॉ. सुमंत दीक्षित
फोटो - ३० डॉ. दिक्षित
===Photopath===
300421\30nsk_23_30042021_13.jpg
===Caption===
फोटो - ३० डॉ. दिक्षित