कोरोना बाधीतांवर खासगी रूग्णालयातही उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 01:41 PM2020-04-11T13:41:25+5:302020-04-11T13:43:20+5:30
नाशिक- शहर परिसरात कोरोना नियंत्रीत करण्यासाठी महापालिकेच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यामुळे आता संशयित रूग्णांना केवळ महापालिकेच्याच नव्हे तर खासगी रूग्णालयात देखील दाखल करून उपाचार करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यादृष्टीने महापालिकेच्या वतीने खासगी हॉस्पीटल चालकांची बैठक देखील घेण्यात आली.
नाशिक- शहर परिसरात कोरोना नियंत्रीत करण्यासाठी महापालिकेच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यामुळे आता संशयित रूग्णांना केवळ महापालिकेच्याच नव्हे तर खासगी रूग्णालयात देखील दाखल करून उपाचार करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यादृष्टीने महापालिकेच्या वतीने खासगी हॉस्पीटल चालकांची बैठक देखील घेण्यात आली.
महापालिकेच्या राजीव गांधी भवनात घेण्यात आलेल्या बैठकीत खाजगी वैद्यकीय क्षेत्रातील वैद्यकिय व्यवसायिकांनी मनपास सहकार्य करावे असे आवाहन आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले.या बैठकीत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुरेश जगदाळे,मनपाचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र त्रंबके, डॉ कल्पना कुटे, डॉ. प्रशांत शेटे,डॉ.आवेश पलोड यांच्यासह खासगी रूग्णालयांचे संचालक उपस्थित होते.
शहरात कोरोना या आजारापासून मुक्त राहावे यासाठी खासगी वैद्यकिय व्यवसायिक व रूग्णालय चालकांनी मनपा व शासकीय यंत्रणेस सहकार्य करावे असे आवाहन आयुक्त गमे यांनी केले यावेळी शहरातील खाजगी वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या खासगी वैद्यकिय व्यवसायिकांनी रोग प्रतिबंधात्मक कारवाई करणेच्या दृष्टीने शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार काम करण्याच्या सूचना करण्यात आल्या. तसेच कोरोना संशयीत रु ग्ण खाजगी रु ग्णालयात दाखल करून त्यांच्या घसा स्त्राव तपासणीस पाठवण्याच्या दृष्टीने व त्या रु ग्णांची खाजगी रु ग्णालयात उपचार करण्यात येणार असून या दृष्टीने चर्चा करण्यात आली. शहरात रु ग्णांची वाढ झाली तर त्यादृष्टीने यंत्रणा सतर्क असावी म्हणून ही उपाययोजना करण्यात येत असल्याचे गमे यांनी सांगितले.तसेच संशयीत रु ग्णाच्या तपासण्या करून योग्य ते उपचार करून नाशिक शहर कोरोना मुक्त होऊ शकेल यादृष्टीने सगळ्यांनी मनपा सहकार्य करावे असे आवाहन गमे यांनी केले.
या बैठकीत अशोका मेडिकव्हरचे डॉ. सागर पालवे, मॅग्नम हॉस्पिटलचे डॉ.मनोज चोपडा, सह्याद्री हॉस्पिटल डॉ.संजय चावला, साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूटचे डॉ. शिवानी साबळे, अपोलो हॉस्पिटल डॉ.हरी मेनन, वोकहार्र्ट हॉस्पिटलचे गौतम ताम्हणे,सुयश हॉस्पिटलचे हेमंत ओसवाल आदी या बैठकीस उपस्थित होते.