लासलगाव कोविड केंद्रात नऊ रुग्णांवर उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 10:53 PM2020-06-24T22:53:44+5:302020-06-24T22:57:07+5:30
लासलगाव : निफाड तालुक्यातील लासलगाव कोविड केंद्रात नऊ रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे. पिंपळगाव बसवंत येथे २० रुग्णांमुळे आरोग्य यंत्रणा सतर्कझाली आहे. तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६७ झाली आहे, अशी माहिती निफाड तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन काळे यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क

पिंपळगाव बसवंतबरोबरच सायखेडा व पिंपळस रामाचे या परिसरात विशेष उपाययोजना केल्या जात आहे. नागरिकांनी मास्कसह विविध उपाययोजनांवर लक्ष दिले पाहिजे तसेच तालुक्यातील एकूण ६९ रुग्णांपैकी ३५ रुग्ण बरे झाले असून, २७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आरोग्य यंत्रणा सतर्कनिफाड तालुक्यातील बेहेड, चांदोरी, चाटोरी, करंजगाव, लासलगाव, मरळगोई, निमगाव वाकडा, ओझर, पाचोरे बुद्रुक, पिंपळस रामाचे, पिंपळगाव बसवंत, पिंपळगाव नजीक, सायखेडा, वेळापूर, विंचूर , विष्णुनगर, खेडलेझुंगे, शिरवाडे वणी, आहेरगाव या गावांत कोरोना रुग्ण आढळले आहेत. सर्वाधिक २० रुग्ण पिंपळगाव बसवंत येथे, विंचूर येथे सात, लासलगाव येथे चार, चांदोरी, ओझर, पिंपळस रामाचे, सायखेडा या भागातील रुग्णांची संख्या लक्षात घेऊन तातडीने आरोग्य यंत्रणा सतर्कझाली आहे. कोरोना सदृश लक्षणे दिसली तर तातडीने वैद्यकीय उपचार घ्यावेत, असे आवाहन डॉ. चेतन काळे यांनी केले आहे.