मालेगावी जंगली प्राण्यांवर उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2020 10:07 PM2020-05-05T22:07:51+5:302020-05-05T22:08:44+5:30
मालेगाव मध्य : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लॉकडाउन सुरू असताना या दरम्यान डॉक्टर, पोलीस व सफाई कर्मचाऱ्यांप्रमाणेच जिवाची पर्वा न करता पशुवैद्यकीय अधिकारी मालेगावसह तालुक्यातील सुमारे १३ पशुवैद्यकीय दवाखान्यात जंगली व पाळीव प्राण्यांवर उपचार करीत कोरोनाविरुद्ध लढढ्यात आपलं योगदान देत आहेत.
मालेगाव मध्य : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लॉकडाउन सुरू असताना या दरम्यान डॉक्टर, पोलीस व सफाई कर्मचाऱ्यांप्रमाणेच जिवाची पर्वा न करता पशुवैद्यकीय अधिकारी मालेगावसह तालुक्यातील सुमारे १३ पशुवैद्यकीय दवाखान्यात जंगली व पाळीव प्राण्यांवर उपचार करीत कोरोनाविरुद्ध लढढ्यात आपलं योगदान देत आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात २४ मार्चपासून लॉकडाउन आहे. त्यातच एका महिन्यात सुमारे ३५० कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने मुंबई, पुण्यापाठोपाठ मालेगाव शहर कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहे. याच दरम्यान जोखीम पत्करून कर्तव्य बजावणाºया डॉक्टर, पोलीस यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शहरातील इतरही विभागाकडून सजगता बाळगली जात आहे.
याव्यतिरिक्त अनेकजण प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरीत्या आपले योगदान देत आहेत. त्यात प्रामुख्याने पशुवैद्यकीय दवाखान्यात सेवा देत असलेले अधिकारी व कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.
काही अपवादात्मक परिस्थितीत फोनवरून उपचाराबाबत मार्गदर्शन केले जात आहे. एवढेच नव्हे तर वेळप्रसंगी जंगली व पाळीव प्राण्यांचे शवविच्छेदन करण्यात येत आहे.
एप्रिल महिन्यात सूर्य आग ओकत असताना भरउन्हात तालुक्यातील बोलावणे येईल तेथे जाऊन पशुवैद्यकीय उपचार करण्यात येत आहे. १४ पशुवैद्यकीय दवाखान्यात जनावरांवर उपचार चालू आहेत. या सर्व ठिकाणी पशुधन पर्यवेक्षक डॉ. शिंदे, डॉ. बच्छाव, डॉ. खरात, डॉ. खैरे, डॉ. लहारे, डॉ. चव्हाण, डॉ. दळवी, डॉ. चौधरी व डॉ.खैरनार पशुसेवा देत आहेत.
------------------------------------
पाच जागा रिक्त
मालेगावचे सहायक पशुसंवर्धन आयुक्त डॉ.ए. ए. कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पशुधन विकास अधिकारी डॉ. जावेद खाटीक हे तालुक्यातील दाभाडी, रावळगाव, दहिवाळ, करजगव्हाण, सिताणे, कळवाडी, खडकी, चिखळओहळ, हिसवाळ यांसह पाच रिक्त जागा असलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्यात सेवा देत आहेत. यात हरीण, माकड, मोर आदी जंगली प्राण्यांसह गाय, म्हैस, बैल, शेळ्या, मेंढ्या, श्वान व मांजर आदी पाळीव प्राण्यांवर उपचार के ले जात आहेत.