जळगाव नेऊर जनता विद्यालयात वृक्षदिंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 10:24 PM2019-07-09T22:24:18+5:302019-07-09T22:26:13+5:30

जळगाव नेऊर : मविप्र संचलित जनता विद्यालयात वनसप्ताह निमित्तानं वृक्षदिंडी व वृक्षारोपण करण्यात आले.

Tree plant in Jalgaon Neer Janata Vidyalaya | जळगाव नेऊर जनता विद्यालयात वृक्षदिंडी

जळगाव नेऊर विद्यालयात वृक्षारोपण व वृक्ष दिंडीत सहभागी ग्रामस्थ व विद्यार्थी.

Next
ठळक मुद्देपर्यावरण संवर्धन : वृक्षांचे महत्त्व सांगणाऱ्या घोषणा

जळगाव नेऊर : मविप्र संचलित जनता विद्यालयात वनसप्ताह निमित्तानं वृक्षदिंडी व वृक्षारोपण करण्यात आले. शालेय समितीचे अध्यक्ष जयाजी शिंदे यांच्या हस्ते ५० वृक्षांची लागवड विद्यालयाच्या प्रांगणात लावण्यात आली,
याप्रसंगी जनजागृतीसाठी वृक्षदिंडी काढण्यात आली. वृक्षांच्या पालखीचे पूजन शालेय समितीचे सदस्य डॉ. डी.आर. कोकाटे, वाल्मीक दाते, नामदेव गायकवाड, मनोहर दाते, यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी भाऊसाहेब शिंदे, मच्छिंद्र ठोंबरे, शरद तिपायले आदी उपस्थित होते. वृक्षदिंडीत वेशभूषा केलेल्या कलश व तुलशी वृंदावन धारण केलेल्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. पर्यावरण पूरक वृक्षांचे महत्त्व सांगणाºया विविध घोषणा, लेझीम व बॅड पथक दिंडीचे आकर्षण ठरले, याप्रसंगी सी. सी. खैरनार, एस.जी. पानसरे, सी. एन. आहेर उपस्थित होते. संपत बोरणारे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी एस. बी. पाटील, एस.बी. शेळके, ए.एस. जाधव, ए. एन.शिनगर, एस.व्ही. सोनवणे, व्ही.बी. सोनवणे, श्रीमती वर्षा बोराडे, एस.एम. जाधव, व्ही. एम. तांगडे, व्ही. एम. लोकरे, यू. आर. कुदळ, व्ही.बी. गायकवाड मामा, दुकळे मामा, आकाश आहेर, नाना शिंदे यांचे सहकार्य लाभले.

Web Title: Tree plant in Jalgaon Neer Janata Vidyalaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा