वनमहोत्सव सप्ताहात जिल्ह्यात विविध ठिकाणी वृक्षलागवड

By Admin | Published: July 7, 2017 11:35 PM2017-07-07T23:35:11+5:302017-07-07T23:35:35+5:30

नाशिक : जिल्ह्यात विविध ठिकाणी दि. १ ते ७ जुलै वनमहोत्सव सप्ताह म्हणून साजरा करण्यात आला.

Tree plantation in different places in the district during the Van Mahotsav Week | वनमहोत्सव सप्ताहात जिल्ह्यात विविध ठिकाणी वृक्षलागवड

वनमहोत्सव सप्ताहात जिल्ह्यात विविध ठिकाणी वृक्षलागवड

googlenewsNext

नाशिक : जिल्ह्यात विविध ठिकाणी दि. १ ते ७ जुलै वनमहोत्सव सप्ताह म्हणून साजरा करण्यात आला. या सप्ताहात विविध संस्था व शाळेतील विद्यार्थ्यांनी वृक्षांची रोपे लावली. यानिमित्त लागवडीचे समारंभ करण्यात आले. इगतपुरी व निफाड तालुक्यात नवदांपत्यांनीही विवाह समारंभातच रोपांची लागवड केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
येवला : शहरातील श्री गुरुदेव शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी मुक्तानंद महाविद्यालयात वृक्षारोपण दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून येवला शहर पोलीस निरीक्षक संजय पाटील उपस्थित होते. त्यांच्या हस्ते महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य डॉ. बी. बी. रहाणे, संस्थेचे सहसचिव संजय नागडेकर, डॉ. एम. व्ही. पाचोरे, एस. व्ही. धनवटे, आर. बी. दातीर, आर. के. सोनवणे, एन. ओ. दाभाडे, बी. एस. पांढरे, ए. आर. कुमावत, अजय त्रिभुवन, सुनील बाकळे, के. के. जाधव, पी. एन. पाटील, श्रीमती एस. सी. पांडे, नितीन बच्छाव, राजेश भावसार, बी. के. गायकवाड तसेच प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. अंदरसूल येथील लक्ष्मी महिला नागरी पतसंस्थेच्या प्रांगणात संस्थेच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी अध्यक्ष संगीता गायकवाड, उपाध्यक्ष शारदा सुराडे, ज्येष्ठ संचालक मंगला प्रकाश साबरे, व्यवस्थापक मनोहर शेळके, केशव देशमुख, ऋषिकेश देशमुख, अल्पबचत प्रतिनिधी राजेंद्र सुराडे, प्रकाश साबरे, शब्बीर इनामदार उपस्थित होते. बेलगाव कुऱ्हे : पर्यावरणाचे असंतुलन, वाढते प्रदूषण याला आळा घालण्यासाठी इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य, पिंपळगाव घाडगा, टाकेद बुद्रुक आदी गावांना वृक्षलागवड करण्यात आली. यानिमित्त पूर्व भागातील अनेक मजुरांनादेखील रोजगार मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.वनसंवर्धन अभियानाच्या निमित्ताने दि. १ ते ७ जुलै या कालावधीत येथील शाळेत विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली.तालुक्यातील नांदूरवैद्य ग्रामपंचायत परिसर, शाळा, पशुवैद्यकीय दवाखाना, प्राथमिक आरोग्य केंद्र, तलाव, तीर्थक्षेत्र याठिकाणी प्राधान्याने वृक्षलागवड करण्यात आली. वृक्षलागवड अभियान साध्य करण्यासाठी तालुकास्तरावर इगतपुरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश ढोमसे यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षलागवड सुरू आहे.
डोंगरगाव येथे रोपांची लागवड
मेशी : देवळा तालुक्यातील डोंगरगाव येथे वनसप्ताहानिमित्त वृक्षांचे रोपण करण्यात आले. ग्रामपंचायत आणि देवळा वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वनमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. वनसप्ताहांतर्गत वृक्षारोपण करण्यात आले. यात जिल्हा परिषद शाळा, माध्यमिक शाळेच्या शिक्षक व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. मान्यवरांच्या हस्ते रोपांची लागवड करण्यात आली. पूर्व नाशिकचे उपवनसंरक्षक रामानुजन व सहायक वनरक्षक राजन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी वनपरिक्षेत्र अधिकारी एस. डी. पालेवार, वनपाल अशोक सोनवणे, वनरक्षक ए. डब्ल्यू. लोखंडे, डोंगरगावच्या सरपंच सुनीता सावंत, सदस्य संजय पानसरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लालजी सावंत, किसन पानसरे, रमेश सावंत, दीपक सावंत, आधार पानसरे, प्रकाश सावंत, एस. के. सावंत, पोलीसपाटील आहिरे आदि उपस्थित होते.
वटार येथे कृषी सप्ताह
वटार : बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील वटार येथे कृषी सप्ताहानिमित्त गावात, जिल्हा परिषद शाळा व सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात विविध ठिकाणी झाडे लावून कृषी सप्ताह साजरा करण्यात आला. हायस्कूलच्या पटांगणात सरपंच प्रशांत बागुल, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी अनिल देशमुख, माजी सरपंच रामदास खैरनार, उपसरपंच पोपट खैरनार, अनिल पाटील, ग्रामविकास अधिकारी निंबा चिला वाघ, कृषी सहायक धनंजय सोनवणे, जिभाऊ पोपट खैरनार यांच्या हस्ते निंब, चिंच, शिसव यांची रोपे लावण्यात आली.

Web Title: Tree plantation in different places in the district during the Van Mahotsav Week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.