त्र्यंबकेश्वर आश्रमात वृक्षारोपण महायज्ञ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 01:09 AM2018-08-23T01:09:13+5:302018-08-23T01:09:50+5:30
त्र्यंबकेश्वर : येथील संत जनार्दन स्वामी महाराजांच्या आश्रमात अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपण महायज्ञ करण्यात आला. यावेळी बोलताना ते म्हणाले, अध्यात्माबरोबरच गरिबांवर येणारे आकस्मिक संकट किंवा संकटात सापडलेल्या लोकांनाही मदत करण्याची गरज आहे.

केरळ येथे आलेल्या महापुरात आपले सर्वस्व गमावलेल्या संकटग्रस्त लोकांसदर्भात ते बोलत होते. ते म्हणाले, आम्ही बोलण्यापेक्षा कृतीने काम करतो. संत जनार्दन स्वामी महाराज यांच्या त्र्यंबकेश्वर येथील आश्रमात वृक्षारोपण महायज्ञ आहे. या महायज्ञात मला वृक्षारोपण करण्याची संधी मिळते आहे, हे मी माझे भाग्य समजतो. रवींद्र बनसोड यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर सर्व आखाड्यांचे साधुमहंत-संत जनार्दन स्वामी महाराज यांचे उत्तराधिकारी श्रीश्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज उपस्थित होते. भागवत व भजनी गीते सादर करणारा कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते.
नागपंचमीपासून ते बुधवारीपर्यंत (दि. २२) नागपंचमी अनुष्ठानाला बसलेल्या अनुष्ठानार्थींची बुधवारी समाप्ती होती. अनुष्ठान भोजनाने समाप्ती झाली तर संत भोजनाचेही आयोजन करण्यात आले होते. या उपक्र मात पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी वृक्षारोपण करण्यात आले. सुमारे ५३० रोपे लावण्यात आली. आश्रमाच्या जागेत डोंगरावर खड्डे खोदून त्यात आवश्यक खत टाकून आंबा, नारळ, केळी, कर्दळ, वड, पिंपळ, उंबर आदींसह औषधी वृक्षांची ठिकठिकाणी लागवड करण्यात आली.