मेशी येथील शिवसेनेच्या वतीने वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2021 10:40 PM2021-06-08T22:40:48+5:302021-06-09T01:09:41+5:30
मेशी : कोरोना काळातील ऑक्सीजन वायुचे महत्व आणी हा वायु झाडांपासून मोफत आणि मुबलक प्रमाणात मिळतो याविषयीची जनजागृती नागरिकांमध्ये व्हावी आणी झाडांचे महत्व काय आहे याचा संदेश ग्रामस्थांपर्यंत पोहोचला पाहीजे या उद्देशाने मेशी येथील शिवसेना शाखेच्या वतीने मेशी परिसरातील बाबावाडी, बजरंगवाडी आदी ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी लागवड केलेल्या रोपांजवळ झाडे लावा आणि फुकट ऑक्सीजन मिळवा असे फलक लावण्यात आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिव राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी शिवसेनेचे देवळा तालुका संघटक बापूसाहेब जाधव व इतर मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी विश्वास जाधव, शाहू शिरसाठ, त्र्यंबक जाधव, दगडू जाधव, गणेश शिरसाठ, किसन जाधव, सतिश बोरसे, अशोक जाधव, गणेश शिरसाठ, पवन ठाकरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.