'बार्टी'तर्फे त्र्यंबक तालुक्यात वृक्षारोपण !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 11:14 PM2021-06-24T23:14:31+5:302021-06-24T23:15:08+5:30
त्र्यंबकेश्वर : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाची स्वायत्त संस्था असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या समतादूत प्रकल्पाअंतर्गत जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने संपूर्ण राज्यात ५ ते २० जून दरम्यान वृक्षारोपण पंधरवडा साजरा केला गेला.

त्या अनुषंगाने त्र्यंबकेश्वर तालुक्यातील समतादूत सुजाता वाघमारे यांनी नाशिक जिल्ह्यातील शाळा तसेच त्र्यंबकेश्वर तालुक्यातील विविध गावांत विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड केली. यात प्रामुख्याने फळझाडे-आंबा, चिक्कू, चिंच, उंबर सीताफळ औषधी-अडुळसा तसेच जंगली वनस्पती-वड, पिंपळ, बेहडा, बावा अशा एकत्रित ६१ प्रकारच्या वनस्पतींचा सहभाग होता. वृक्षारोपणाकरिता तालुक्यातील तळेगाव, अंजनेरी आश्रम, पेगलवाडी, खंबाळे, तळवाडे, रतनपाडा, पिंप्री तसेच नाशिकच्या कोठारी कन्या शाळा आदींचा सहभाग होता.