सामनगाव परिसरात झाड कोसळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2018 12:41 AM2018-09-23T00:41:29+5:302018-09-23T00:41:54+5:30

सामनगाव परिसरात गुरुवारी दुपारी झालेल्या वादळी पावसात ओम तुळजा लॉन्सजवळ रस्त्याच्या कडेला असलेले बाभळीचे झाड रस्त्यावर कोळसले. दरम्यान, दुचाकीवरून जाणाऱ्या दोघा युवतींनी गाडी सोडून पळाल्याने त्या सुदैवाने वाचल्या.

 The trees collapsed in the area | सामनगाव परिसरात झाड कोसळले

सामनगाव परिसरात झाड कोसळले

Next

नाशिकरोड : सामनगाव परिसरात गुरुवारी दुपारी झालेल्या वादळी पावसात ओम तुळजा लॉन्सजवळ रस्त्याच्या कडेला असलेले बाभळीचे झाड रस्त्यावर कोळसले. दरम्यान, दुचाकीवरून जाणाऱ्या दोघा युवतींनी गाडी सोडून पळाल्याने त्या सुदैवाने वाचल्या. वादळी पावसाने काही ठिकाणी विद्युत वाहिन्या तुटल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला होता.  सामनगावरोड व आजूबाजूच्या परिसरात गुरुवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास वादळी पावसाने जोरदार हजेरी लावली. सामनगावरोड ओम तुळजा लॉन्सजवळ रस्त्याच्या कडेला असलेले बाभळीचे झाड वादळी पावसाने रस्त्यावर कोसळत असताना तेथून अ‍ॅक्टिवा (एमएच १५ जीई ०६३९) हिच्यावरून शेवंता गायकवाड व अश्विनी आहिरे या दोन युवतींनी अ‍ॅक्टिवा गाडी सोडून देत शेजारच्या घरामध्ये पळाल्याने त्या बालंबाल बचावल्या. यामध्ये बाभळीचे झाड अ‍ॅक्टिवा गाडीवर पडल्याने गाडीचे थोडेफार नुकसान झाले आहे. झाड पडल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते योगेश भोर यांनी लागलीच नाशिकरोड अग्निशामक विभागाला दिली. त्यामुळे काहीकाळ रस्त्यावरील वाहतूक बंद पडली होती. अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन कोसळलेल्या झाडाखाली अडकलेली अ‍ॅक्टिवा गाडीबाहेर काढून त्यानंतर झाड रस्त्याच्या कडेला केल्याने रस्ता वाहतुकीसाठी मोकळा झाला. वादळी पावसामुळे परिसरातील काही ठिकाणच्या विद्युत तारा तुटल्याने परिसरात विद्युत पुरवठा खंडित झाला होता.

Web Title:  The trees collapsed in the area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक