वादळी पावसाने झाडे जमीनदोस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 06:47 PM2021-06-03T18:47:28+5:302021-06-04T01:10:45+5:30
लासलगाव : जून महिन्याच्या रोहिणी नक्षत्राचा लासलगाव व परिसरात दुपारी ४ वाजेच्या वाजेच्या सुमारास मान्सूनपूर्व वादळी पावसाने जोरदार सलामी दिली. त्यामध्ये गावातील काही झाले तसेच घराचे पत्रे उडून गेले. तसेच पाच पोल कोसळले आहे.

गुरुवारी (दि.३) दुपारपासूनच आकाशात ढग जमा झाल्याने ढगाळ वातावरण निर्माण झाले. त्यामुळे असह्य उकाडा निर्माण झाला होता. दुपारी ४ वाजेच्या सुमारास अचानक वादळी वारा व विजेच्या कडकडाटासह पावसाने सुमारे एक तास जोरदार हजेरी लावल्यामुळे उष्णतेने व्याकुळ झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला.
ब्राह्मणगाव विंचुर येथील चार झाड कोसळले. तसेच बबन दरगुडे यांच्या शेतातील घराचे पत्रे उडाले. तर विज वितरण कंपनीचे पाच पोल तुटून पडली आहे. तसेच रोड लगतची चार झाडे रोडवरती पडल्याने शेतात येणाऱ्या जाणाऱ्यांची मोठी अडचण झाली आहे.
या मान्सूनपूर्व पावसामुळे शेतकऱ्यांचे पिकाचे देखिल नुकसान झाल्याचे चित्र दिसून आले. एकीकडे कोरोनाची धास्ती आणि त्यात जोरदार पावसाची हजेरी यामुळे शेतकरी धास्तावला आहे. शेतकऱ्यांच्या शेतातील काढणीला आलेला गहू, हरभरा, कांदा तसेच भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे शेतकरी वर्गाकडून बोलले जात आहे.