बिबट्याच्या हल्ल्यातून ट्रेकर्स बचावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2019 01:12 AM2019-03-22T01:12:01+5:302019-03-22T01:13:14+5:30

पांडवलेणी परिसरातील राखीव वनक्षेत्र घोषित असलेल्या डोंगरावर विनापरवाना ट्रेकिंगसाठी गेलेल्या एका तीस वर्षीय युवकावर बिबट्याने चाल करत पंजा मारला. मात्र चढावरून बिबट्याचा तोल गेल्याने तो खाली घसरल्यामुळे ट्रेकर्स थोडक्यात वाचला.

 Trekkers survived by leopard attack | बिबट्याच्या हल्ल्यातून ट्रेकर्स बचावला

बिबट्याच्या हल्ल्यातून ट्रेकर्स बचावला

googlenewsNext
ठळक मुद्देपांडवलेणी : चढावरून बिबट्या घसरला; युवक जखमी

नाशिक : पांडवलेणी परिसरातील राखीव वनक्षेत्र घोषित असलेल्या डोंगरावर विनापरवाना ट्रेकिंगसाठी गेलेल्या एका तीस वर्षीय युवकावर बिबट्याने चाल करत पंजा मारला. मात्र चढावरून बिबट्याचा तोल गेल्याने तो खाली घसरल्यामुळे ट्रेकर्स थोडक्यात वाचला.
मिळालेल्या माहितीनुसार गणेश पांडुरंग पानसरे (३०, रा. साईबाबानगर, सिडको) हा आपल्या मित्रांसोबत गुरुवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास पांडवलेणी येथे ट्रेकिंगसाठी गेला होता. त्याच्यासोबत असलेले अन्य मित्र हे डोंगराच्या पायथ्याशी थांबून होते. पानसरे हा डोंगराच्या मध्यापर्यंत पोहचल्यानंतर कपारीत दडून बसलेल्या बिबट्याला धोक्याची जाणीव झाल्याने त्याने चाल केली असावी, असे सूत्रांनी सांगितले. सुदैवाने बिबट्याच्या या हल्ल्यात पानसरे बचावला अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.
किरकोळ जखमेवर निभावला हल्ला
पानसरे हा डोंगर चढत असताना त्याला बिबट्याच्या वास्तव्याची चाहूल लागताच तो वेळीच सावध झाला. मात्र बिबट्याने पळ काढताना त्याच्यावर पंजा मारत चाल केली. यावेळी बिबट्या खाली घसरला आणि सुदैवाने किरकोळ जखमेवर वन्यप्राण्याचा हल्ला निभावून गेला.

Web Title:  Trekkers survived by leopard attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.