नाशिकमध्ये 7 फूट लांब 'इंडियन कोब्रा' पकडतानाचा थरार कॅमे-यात कैद

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2017 04:13 PM2017-08-14T16:13:54+5:302017-08-14T16:30:16+5:30

अझहर शेख/नाशिक, दि. 14 - वन्यजीव वाचवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या नाशिकमधील इको-एको फाउंडेशननं एका अपार्टमेंटमधून तब्बल 7 फूट लांब इंडियन ...

A trembling cam caught in a 7-ft long 'Indian Cobra' in Nashik | नाशिकमध्ये 7 फूट लांब 'इंडियन कोब्रा' पकडतानाचा थरार कॅमे-यात कैद

नाशिकमध्ये 7 फूट लांब 'इंडियन कोब्रा' पकडतानाचा थरार कॅमे-यात कैद

Next

अझहर शेख/नाशिक, दि. 14 - वन्यजीव वाचवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या नाशिकमधील इको-एको फाउंडेशननं एका अपार्टमेंटमधून तब्बल 7 फूट लांब इंडियन कोब्रा पकडला व यानंतर त्याला निर्जन भागात सुरक्षितरित्या सोडण्यातही आले. बडदे नगर येथील सिडको भागातील साई स्नेह हाईट्स अपार्टमेंटमधील ही घटना आहे. सोसायटीमध्ये कोब्रा शिरल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. यानंतर रहिवाशांनी तातडीनं  इको-एको फाउंडेशनसोबत संपर्क साधला. व फाऊंडेशनच्या प्रशिक्षित स्वयंसेवकांनी घटनास्थळी धाव घेत तब्बल सात फूट लांब इंडियन कोब्रा (नाग) पकडल्यानंतर रहिवाशांनी निःश्वास सोडला.  

इंडियन कोब्रा भारतात आढळणाऱ्या चार प्रमुख विषारी सापांच्या जातींपैकी एक आहे. त्याचा मानवी जीवास जरी धोका असला तरी त्याचा काही फायदादेखील आहेत. करण हा साप शेतातील उंदीर संपवून शेतकऱ्याची एक प्रकारे मदतच करतो. उंदरांना त्यांचा बिळात जाऊन संपवणारा असा हा एकमेव नाग आहे. प्रत्येक साप चावल्याच्या घटनेमागे माणसाची चूक असते पण तो  ती चूक मान्य करत नाही, अशी प्रतिक्रिया इको-एको फाउंडेशनचे अभिजित महाले यांनी दिली.

{{{{dailymotion_video_id####x8459zf}}}}

Web Title: A trembling cam caught in a 7-ft long 'Indian Cobra' in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.