स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच फडकणार तिरंगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 01:06 PM2018-08-08T13:06:15+5:302018-08-08T13:06:34+5:30
ओझर- ‘पोटदुखी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उमाजीनगरमधील समस्यांना काही अंशी यश आले असून पिंपळगावमधील संतोषी माता सामाजिक संस्था मुलांच्या मदतीसाठी सरसावली आहे. तर स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच तिरंगा फडकणार असल्याने उत्साहाचे वातावरण आहे. गेल्या शनिवारी ‘लोकमत’ने मांडलेल्या उमाजीनगरमधील समस्यांचा ऊहापोह केला होता. येथे मुख्य मुलभुत सुविधांचीच वणवा असताना केवळ सीमारेषेमुळे येथील नागरिकांचे पालकत्व स्वीकारण्यासाठी कोणी सरसावत नाही.यात नेमके मुलांच्या आयुष्यात याचा परिणाम नको व्हायला हेच मूळ उद्दिष्ट डोळ्यासमोर सदर संस्थेने ठेवला आहे.अनेक वेळेला निवेदन देऊन झाली.मतदान ओझरला करताना वास्तव्याची जागा मात्र नाशिक तालुक्यात आहे. यंदा स्वातंत्र्य दिनाचे औचित्य येथील अंगणवाडीत मुलांना शिक्षणासाठी गणवेश ,बूट, दप्तर, वह्या तसेच ज्ञानदानाचे काम करणाºया महिलांना साडी चोळी देण्यात येणार आहे.
-------------------
यंदा ‘पोटदुखी’तील उमाजीनगरमधील पत्र्याच्या शेडसमोर प्रथमच येत्या स्वातंत्र्यदिनी तिरंगा फडकणार असून झेंडा वंदनसाठी बालके देखील सुटबुटात तिरंग्यास वंदन करतील.यासर्व उपक्र मासाठी पिंपळगावचे केशवराव बनकर मंडळाचे अध्यक्ष श्रीकेतन पुरकर दत्तात्रय जाधव, सदस्य धनंजय संधान, राजू कडाळे, हिरामण उगले, प्रदीप वालवणे, गणेश कोपरे, दिलीप सूर्यवंशी, किशोर कापसे, बंटी जाधव, रोहित शिंदे, नामदेव विधाते, विकास आथरे शुभम दवंगे, भूषण शिरापुरे, अल्पेश मेथकर, महेश रसाळ, विनायक घोंगाने,
अविष्कार पुरकर, किरण बनकर, संकेत बनकर, चेतन बनकर आदींनी सहभाग घेतला आहे. (०८ ओझर)