अंदरसूल गटात तिरंगी लढत

By admin | Published: February 14, 2017 12:25 AM2017-02-14T00:25:41+5:302017-02-14T00:29:39+5:30

लक्षवेधी : येवला तालुक्यात नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Tri-team fight in under-pool | अंदरसूल गटात तिरंगी लढत

अंदरसूल गटात तिरंगी लढत

Next

 प्रकाश साबरे अंदरसूल
येवला तालुक्यातील अंदरसूल गट आतापर्यंत नेहमीच निर्णायक भूमिका घेणारा गट म्हणून ओळखला जातो. या गटात शिवसेनेचे मकरंद सोनवणे, राष्ट्रवादीचे महेंद्रकुमार काले, भाजपाचे बाबासाहेब डमाळे व काँग्रेसचे रावसाहेब लासुरे हे सर्व मिनी मंत्रालयात जाण्यासाठी नशीब आजमावत आहेत.
गटातील अंदरसूल गणातून पंचायत समितीसाठी शिवसेनेच्या वतीने अंदरसूल येथील नम्रता जगताप, राष्ट्रवादीकडून अंदरसूलच्या स्वाती सोनवणे, भाजपाच्या वतीने सखाहरी लासुरे, काँग्रेसच्या वतीने शिवाजी धनगे रिंगणात आहेत. गटातील नागडे गणात शिवसेनेच्या वतीने माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण गायकवाड, भाजपाच्या वतीने दादाभाऊ मोरे, राष्ट्रवादीकडून भारती सोनवणे, काँग्रेसकडून मीरा माळी रिंगणात आहेत. गटात अटी-तटीच्या व तुल्यबळ लढती रंगणार असल्याने या गटाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. तालुक्यातील प्रमुख चार नेत्यांपैकी माजी आमदार मारुतीराव पवार व नरेंद्र दराडे यांनी धनुष्यबाण उचलले असून, अंबादास बनकर व अ‍ॅड. माणिकराव शिंदे यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ सांभाळले आहे. मात्र तिकीट वाटपात बनकर व पाटील यांचा प्रभाव जाणवतो. शिवसेनेचे माजी आमदार कल्याराव पाटील यांनी भाजपाचे कमळ हाती घेतले आहे. अंदरसूल गट हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला. मात्र भुजबळ समर्थकांतील अंतर्गत गटबाजींमुळे बंडाळी दिसून येते आहे.

Web Title: Tri-team fight in under-pool

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.