त्र्यंबकला बॅटरीवर चालणार घंटागाड्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2018 01:14 AM2018-07-05T01:14:13+5:302018-07-05T01:15:22+5:30

त्र्यंबकेश्वर : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि प्रदूषण रोखण्यासाठी बॅटरीवर चालणाºया घंटागाडीचे येथे प्रात्यक्षिक घेण्यात आले. थेट गल्लीबोळांत जाऊन कचरा जमा करणारी घंटागाडी त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेने प्रात्यक्षिकांसाठी मागविली होती. ही घंटागाडी रिक्षेच्या आकाराची आहे.

Triangular battery to run on the ghantagadi! | त्र्यंबकला बॅटरीवर चालणार घंटागाड्या !

त्र्यंबकला बॅटरीवर चालणार घंटागाड्या !

Next
ठळक मुद्देउपनगराध्यक्ष स्वप्निल शेलार यांनी या घंटागाडीचे स्वत: प्रात्यक्षिक घेतले.

त्र्यंबकेश्वर : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि प्रदूषण रोखण्यासाठी बॅटरीवर चालणाºया घंटागाडीचे येथे प्रात्यक्षिक घेण्यात आले. थेट गल्लीबोळांत जाऊन कचरा जमा करणारी घंटागाडी त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेने प्रात्यक्षिकांसाठी मागविली होती. ही घंटागाडी रिक्षेच्या आकाराची आहे. उपनगराध्यक्ष स्वप्निल शेलार यांनी या घंटागाडीचे स्वत: प्रात्यक्षिक घेतले. यावेळी आरोग्य सभापती विष्णू दोबाडे, सागर उजे, कुणाल उगले आदी नगरसेवक उपस्थित होते. शेलार यांच्या संकल्पनेतून सदर घंटागाडीचे प्रात्यक्षिक घेण्यात आले.
त्र्यंबकेश्वर हे धार्मिक नगरी म्हणून ओळखली जाते. याठिकाणी संपूर्ण भारतातून भाविक पर्यटक येत असतात ही नगरी प्रदूषणमुक्त रहावी याकरिता बॅटरीवर चालणारी घंटागाडी शहरात असावी अशी संकल्पना उपनगराध्यक्षांनी मांडली होती.बॅटरीवर चालणाºया घंटागाडीला एकदा बॅटरी चार्ज केल्यावर साधारण १०० तास, तर एका वेळेस ४०० किलो कचरा वाहतुकीची क्षमता आहे. विशेष म्हणजे या घंटागाडीला हैड्रोलिक सिस्टीम असून, कचरा खाली करायलाही सोपे आहे.

Web Title: Triangular battery to run on the ghantagadi!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.