सरपंचपदासाठी तिरंगी लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2019 09:33 PM2019-11-28T21:33:51+5:302019-11-28T21:34:30+5:30

विंचूर : निफाड तालुक्यातील हनुमाननगर ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदासाठी तिरंगी लढत होत आहे. सदस्य पदाच्या एकूण नऊ जागा असून, दोन जागा रिक्त राहिल्या असल्याने उर्वरित जागांसाठी १५ उमेदवार नशीब अजमावत आहेत. हनुमाननगरला सरपंचपद सर्वसाधारण पुरु ष म्हणून आरक्षित आहे.

Triangular fight for sarpanch post | सरपंचपदासाठी तिरंगी लढत

सरपंचपदासाठी तिरंगी लढत

Next
ठळक मुद्देहनुमाननगर : सर्वसाधारण पुरुषगटासाठी आरक्षित

लोकमत न्यूज नेटवर्क
विंचूर : निफाड तालुक्यातील हनुमाननगर ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदासाठी तिरंगी लढत होत आहे. सदस्य पदाच्या एकूण नऊ जागा असून, दोन जागा रिक्त राहिल्या असल्याने उर्वरित जागांसाठी १५ उमेदवार नशीब अजमावत आहेत. हनुमाननगरला सरपंचपद सर्वसाधारण पुरु ष म्हणून आरक्षित आहे.
सरपंचपदासाठी गोपीनाथ ठुबे, ज्ञानेश्वर सालगुडे यांनी अर्ज दाखल करून दोन परस्परविरोधी पॅनल बनविले आहे, तर शोभा भडांगे यांनीही सरपंचपदासाठी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. सदस्यपदासाठी गोपीनाथ ठुबे यांच्या पॅनलमधून वॉर्ड क्रमांक एकमधून दोन जागांसाठी छाया दरेकर, राहुल सालगुडे, वॉर्ड क्र मांक दोनमधून दोन जागांसाठी रंजना ठुबे, मनीषा सालगुडे तर वॉर्ड क्र मांक तीनमधून तीन जागांसाठी अंबादास सालगुडे, मालतीबाई सालगुडे, रवींद्र कडलग आदींचे अर्ज दाखल आहेत.
ज्ञानेश्वर सालगुडे यांच्या पॅनलला सुमन जाधव, श्रावण सालगुडे, आशा दरेकर, शैला गुंजाळ, भास्कर कडलग, संगीता गुंजाळ, तुकाराम कडलग आदींनी अर्ज दाखल केले आहेत.
तसेच वॉर्ड क्रमांक दोनमधून शोभा भडांगे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. वॉर्ड क्र मांक एक व वॉर्ड क्रमांक दोनमधील प्रत्येकी एक जागा रिक्त राहिली आहे. यावेळी थेट जनतेतून सरपंचाची निवडणूक असल्याने नागरिकांची उत्सुकता ताणली गेली आहे. हनुमाननगरला एकूण ३ वॉर्ड आहेत. या ग्रामपंचायतीमध्ये १०८८ मतदार आहेत. सरपंचाशिवाय ९ सदस्य निवडून द्यायचे होते. परंतु दोन सदस्य जागेसाठी कुणाचाही अर्ज आला नसल्याने दोन जागा रिक्त असून, सात सदस्य पदासाठी निवडणूक होत आहे. मतदान ८ डिसेंबर रोजी होणार असून, ९ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.

Web Title: Triangular fight for sarpanch post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.